· जिल्हाधिकारी
कार्यालय वगळता जिल्ह्यात अन्य कोणत्याही ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करु
नये
हिंगोली दि.28: करोना विषाणुचा संसर्ग
टाळण्यासाठी यावर्षी राज्यात महाराष्ट्र दिन हा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित
करण्याचे निर्देश महाराष्ट्र शासनाने दि. 15 एप्रिल, 2020 च्या परिपत्रकान्वये
दिले आहे. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 60 वा वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार दि. 01
मे, 2020 रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली
येथे सकाळी 08.00 वाजता शालेय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री श्रीमती वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते संपन्न होणार
आहे. शासन परिपत्राकान्वये यावेळी पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी हे उपस्थित राहतील. यावेळी जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहणाच्या
कार्यक्रमात इतर अधिकारी/कर्मचारी यांनी उपस्थित राहू नये.
तसेच
सर्व उपविभागीय अधिकारी यांची कार्यालये व तहसील कार्यालये येथे ध्वजारोहणाचा
कार्यक्रम आयोजित करण्यात येवू नये. जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली वगळता हिंगोली
जिल्ह्यात अन्य कोणत्याही ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात येवू नये
असे जिल्हा प्रशासनामार्फत प्रसिध्दी पत्रकान्वये कळविण्यात आले आहे.
*****
No comments:
Post a Comment