14 April, 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील खते, बि-बियाणांची दुकाने व परवानाधारक कृषि केंद्रे सुरु ठेवण्याकरीता वेळापत्रक जाहिर



·   दिलेल्या वेळेनुसार सुरक्षेची योग्य खबरदारी घेऊन दुकाने सुरु ठेवण्याचे निर्देश

हिंगोली,दि.14: जागतिक आरोग्‍य संघटनेने कोरोना (कोव्‍हीड-19) हा विषाणू मूळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्‍य आजार म्‍हणून घोषीत केला आहे. कोरानाग्रस्त रुग्‍णांच्या संपर्कात लोकांनी येवू नये, तसेच सार्वजनिक किंवा खाजगी जागेत पाच किंवा त्‍यापेक्षा अधिक व्‍यक्‍तीनी एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे, काही कार्यक्रमाचे आयोजन केल्‍यास या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्‍याची शक्‍यता लक्षात घेता सर्वसामान्‍य जनतेस व त्‍यांचे आरोग्‍यास धोकादायक निर्माण होऊ शकतो. यामुळे  फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1)(3) अन्वये संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी लागू झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
खरीब हंगाम हा जवळ येत आहे व व्यापा-यांना खते व बियाणेचा साठा करण्यासाठी तसेच शेतीसाठी उपयोगी महत्वाचे साहित्य जसे की, ड्रीप, स्पिंकलर व पाईप पुरवठा सुरळीत असणे आवश्यक आहे करीता ही सर्व दुकाने व जिल्ह्यातील परवाना धारक कृषी केंद्र उघडणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी खालील तक्त्यात दर्शविण्यात आलेल्या वेळेनुसार सुरक्षेची योग्य खबरदारी घेऊन सुरु ठेवण्याबाबत निर्देश दिले आहेत.
अ.क्र.
दिनांक
वार
वेळ

1
15/04/2020
बुधवार



   सकाळी 09.00 ते दु.1.00 वाजेपर्यंत

2
17/04/2020
शुक्रवार
3
19/04/2020
रविवार
4
21/04/2020
मंगळवार
5
23/04/2020
गुरुवार
6
25/04/2020
शनिवार
7
27/04/2020
सोमवार

8
29/04/2020
बुधवार


आदेशात दिलेल्या कालावधी वगळता इतर कालावधी कोणासही घराच्या बाहेर पडता येणार नाही. अत्यावश्यक तसेच अपरिहार्य परिस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती नियंत्रण कक्षाचा क्र. 02456-222560 वर किंवा तालुका स्तरावरील नियंत्रण कक्षावर किंवा टोल फ्री क्र. 100 वर संपर्क करावा. तसेच संचारबंदी कालावधी मध्ये परवानगी घेतलेल्या व्यक्ती शिवाय इतर कोणतीही व्यक्ती रस्त्याने बाजार मध्ये, गल्ली मध्ये घराबाहेर फिरतांना आढळुन आल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच भारतीय दंड सहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल. उपरोक्त ठिकाणे/कार्यक्रम येथील संबंधित आयोजक तसेच आस्‍थापना मालक/चालक/व्‍यवस्‍थापक यांना प्रत्‍येकास आदेशापूर्वी स्वतंत्र नोटीस बजावणी शक्य नसल्याने याबाबतची माहिती प्रसार माध्यमे, उप विभागीय दंडाधिकारी, तालूका कार्यकारी दंडाधिकारी, पोलीस स्टेशन, सर्व जि. हिंगोली यांचे नोटीस बोर्डवर नागरिकांचे सुविधेसाठी उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.     


No comments: