25 April, 2020

हिंगोलीत अजून एक कोरोना बाधीत रुग्ण



·   हिंगोली जिल्ह्यात एकुण 7 कोरोना बाधीत रुग्ण ; सर्वांची प्रकृती स्थीर
                        -जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास

हिंगोली दि.25: येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आज एक 27 वर्षीय कोरोना बाधीत रुग्णास दाखल करण्यात आले आहे. सदर रुग्ण हा जालना येथील राज्य राखीव पोलीस दलातील जवान आहे. मालेगाव येथील बंदोबस्ताहून परतल्यानंतर तो हिंगोली येथील आपल्या गावी आला होता. या जवानाला कोरोना (कोविड-19) ची लागण झाल्याचा अहवाल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद येथून आज प्राप्त झाला आहे. त्यामुळे त्याला आणि त्याच्या संपर्कात आलेल्या 46 जणांना आज येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती करण्यात आले आहे. या जवानांची प्रकृती स्थीर असुन त्यास कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे नाहीत, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी कळविले आहे.
कोरोना विरुध्द लढ्यात नागरीकांनी सोशल डिस्टन्सींगच्या नियमाचे पालन करावे. तसेच सर्व सुजाण नागरिकांनी अत्यंत महत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक सेवा वगळता घरीच थांबून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. 

****

No comments: