25 April, 2020

जिल्ह्यातील भारत 4 मानांकन वाहनांची नोंदणी प्रक्रीया 30 एप्रिलपर्यंत पुर्ण करावी -उपप्रादेशिक परिवहन अधिकारी



हिंगोली दि.25: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे भारत 4 मानांकन असणाऱ्या नोंदणी न झालेल्या वाहनांची नोंदणी प्रक्रिया दिलेल्या अटी व शर्तीची पुर्तता करुन दि. 30 एप्रिल, 2020 पर्यंत पूर्ण करावी अशा सुचना केल्या आहेत. Federation of Automobile Dealers Association (यांनी मा. सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या शपथपत्राची प्रत (आदेशात नमुद करण्यात आल्याप्रमाणे विक्री केलेल्या नोंदणी न झालेल्या वाहनांच्या यादीसह) राज्यातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांना पुरविण्याबाबत सूचना FADA यांना परिवहन आयुक्त कार्यालयाने दिलेल्या आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील नोंदणीकृत वाहन वितरकांनी दि. 31 मार्च, 2020 पूर्वी विकलेल्या परंतु नोंदणी क्रमांक अद्याप जारी न झालेल्या आपल्या वितरण संस्थेतील वाहनांबाबत Federation of Automobile dealers Association(FADA) यांच्याशी संपर्क करुन योग्य ती कार्यवाही करावी.
परिवहन आयुक्त कार्यालयाने दिलेल्या सुचनेप्रमाणे वाहन वितरण संस्थेद्वारे FADA ला सादर केलेल्या वाहनांची यादी परिवहन आयुक्त कार्यालयामार्फत या कार्यालयास प्राप्त  होणाऱ्या वाहनांचीच नोंदणी प्रक्रीया पूर्ण करणेबाबत आपल्या स्तरावरील कार्यवाही पूर्ण करण्यात यावी व अशीच नोंदणी प्रक्रीया दि. 30 एप्रिल, 2020 पर्यंत पूर्ण होईल याची दक्षता घेण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
****


No comments: