प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करा
· दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमास
उपस्थित नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी
-पालकमंत्री वर्षाताई गायकवाड
हिंगोली दि. 07: कोरोनाचा
संसर्ग रोखणे हेच सध्या आपल्या सर्वांचे सर्वोच्च प्राधान्य आहे त्यामुळे
जिल्ह्यात प्रशासनाने जे प्रतिबंधात्मक उपाय सुरु केले आहेत. त्याचे जिल्ह्यातील
जनतेने काटेकोरपणे पालन करावे,असे आवाहन पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी केले
आहे.
जिल्ह्यात एक कोरोना रुग्ण (पॉझिटिव्ह) असून त्याची प्रकृती स्थिर
आहे. तसेच खबरदारी म्हणून काहीं नागरिकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. या
संदर्भात आरोग्य विभागाकडुन सर्व प्रकारची दक्षता घेतली जात आहे संचार बंदीच्या
काळात शासन आणि प्रशासन याबाबतीत सतर्क असून जिल्ह्यातील जनतेच्या हितासाठी योग्य नियोजन
करण्यात येत आहे. परंतु आता गरज आहे ते तुमच्या सहकार्याची. सहकार्य फक्त एवढेच
करा प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन करा. घरातच राहा आणि आपली व आपल्या कुटुंबाच्या
आरोग्याची दक्षता घ्या. त्यामुळे संचार बंदीच्या कालावधीत घरातून कोणीही बाहेर पडू
नका. अशी विनंती पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी केली आहे.
तसेच दिल्ली येथील निजामुद्दीन मरकज, जिल्हा पानिपत हरियाणा, राज्यस्थान, उत्तर
प्रदेश व देशाच्या इतर भागात झालेल्या जमात धार्मिक कार्यक्रमास जिल्ह्यातील
जे नागरिक जावून आले आहेत. त्या सर्व नागरिकांनी स्वतःहून समोर येवून आपली माहिती जिल्हा
प्रशासनास देवून आपली आरोग्य तपासणी करुन घ्यावी . याकरीता जिल्हा प्रशासनातर्फे आपणास
योग्य ते सर्व सहकार्य करण्यात येईल.
असे आवाहन पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी सर्वांना केले आहे.
*****
No comments:
Post a Comment