·
हिंगोली जिल्ह्यात एकुण 11 कोरोना बाधीत रुग्ण ; सर्वांची प्रकृती
स्थीर
-जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास
-जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास
हिंगोली दि.27: येथील राज्य राखीव बलातील
मालेगाव येथे बंदोबस्तासाठी जावून आलेल्या 04 जवानांना आज जिल्हा सामान्य
रुग्णालयात हिंगोली येथील आयसोलेशन वार्डमध्ये दाखल करण्यात आले. या 04 रुग्णांचा पहिला
तपासणी अहवाल निगेटिव्ह आला होता. यापैकी 03 जवानांना दि. 23 एप्रिल, 2020 रोजी
ताप, सर्दी, खोकला असल्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वार्डमध्ये
भरती करण्यात आले होते. तर एका जवानास दि. 24 एप्रिल रोजी आयसोलेशन वार्डमध्ये
भरती करण्यात आले होते. या 04 जवानांचा थ्रोट स्वॅब अहवाल दि. 25 एप्रिल रोजी तपासणीसाठी
पाठविण्यात आला होता. या 04 जवानांचा अहवाल आज प्राप्त झाला असता त्यांना कोरोनाची
लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
सद्यस्थितीत हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात
कोविड-19 ची लागण झालेल्या राज्य राखीव बलातील 11 जवानांना दाखल केले आहे.
त्यापैकी 10 जवान हे राज्य राखीव बल, हिंगोली येथे कार्यरत असून 01 जवान हा राज्य
राखीव बल, जालना येथे कार्यरत आहे. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून, त्यांना
कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे सद्यस्थितीत नाहीत, अशी माहिती जिल्हा शल्य
चिकित्सक किशोर श्रीवास यांनी दिली आहे.
कोरोना विरुध्द लढ्यात हिंगोलीकरांनी
सोशल डिस्टन्सींगच्या नियमाचे पालन करावे. तसेच
सर्व नागरिकांनी अत्यंत महत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. तसेच घरी
थांबून आपले आणि आपल्या कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घेवून जिल्हा प्रशासनास
सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
****
No comments:
Post a Comment