20 April, 2020

रास्तभाव दुकानदारांनी नियमानुसार लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण करावे - पालकमंत्री वर्षाताई गायकवाड



·   जिल्ह्यात आतापर्यंत 7204 मेट्रीक टन अन्नधान्याचे वितरण
·   जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्यावर होणार कारवाई

हिंगोली, ‍दि.20: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन कालावधीत जिल्ह्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. या कालावधीत गरजवंताना जीवनावश्यक वस्तुचा पुरवठा करण्याचे व्यवस्थीत नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील रास्तभाव दुकानादारांनी शासन निर्णयानुसार लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण करावे असे निर्देश पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी दिले आहेत.
हिंगोली जिल्ह्यात अंत्योदय योजना-931.4 मेट्रीक टन, प्राधान्य कुटूंब-3039.1 मेट्रीक टन, एपीएल शेतकरी-1012 मेट्रीक टन, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंत्योदयसाठी-663 मेट्रीक टन, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना प्राधान्य कुटूंबासाठी-3812.7 मेट्रीक टन असे एकुण 9,458.2 मेट्रीक टन गहू व तांदूळ मिळून 797 रास्तभाव दूकानदारांना शिधापत्रिकाधारकांना वितरीत करण्यासाठी देण्यात आले आहे. तसेच एपीएल केशरी योजनेंतर्गत ज्या कुटुंबांचे वार्षीक कौटुंबीक उत्पन्न एका लाखाच्या आत आहे व ज्यांना सद्यस्थितीत कुठल्याही प्रकारच्या  अन्नधान्याचा  लाभ मिळत नाही अश्या एपीएल केशरी शिधापत्रिका धारकांना माहे मे व जून करीता गहु व तांदुळ असे एकुण पाच किलो अन्नधान्य  प्रती व्यक्ती उपलब्ध होणार आहे.
जिल्ह्यातील रास्तभाव दुकानामार्फत अन्नधान्याचे वितरण व्यवस्थीत करण्यात येत असून, आतापर्यंत जिल्ह्यातील 31 हजार 012 शिधापत्रिकाधारकांना आजपर्यंत 7204 मेट्रीक टन अन्नधान्याचे वितरण करण्यात आले आहे. तसेच अनियमितता असणाऱ्या एका किराणासह चार रास्तभाव दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा चढ्या दराने विक्री केल्यास, किंवा काळाबाजार केल्यास सात वर्षापर्यंत कैद होवू शकते. याबाबत पुरवठा विभाग, वैध मापन शास्त्र विभाग व पोलीस यांना संयुक्त कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतू तशी वेळ येवू देवू नये, ही वेळ देश व समाजाप्रती जवाबदारी बांधीलकी सिद्ध करण्याची वेळ आहे. तसेच गावामध्ये अन्नधान्य उचल केल्यावर रास्तभाव दुकानदारांनी लॉउड स्पिकरद्वारे लाभार्थ्यांना कळवुन अन्नधान्य पुरवठा करावा, रास्तभाव दुकानदारांनह अन्नधान्य वाटप करतांना लाभार्थ्यांना 01 मिटर अंतरावर उभे करण्यासाठी मार्कींग करुन अन्नधान्याचे वितरण करावे, असे आवाहन पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी केले आहे.

****

No comments: