हिंगोली, दि. 10 : निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन
धारकांना महाराष्ट्र कोषागार नियम 1968 च्या नियम 335 नुसार दरवर्षी दिनांक 1
नोव्हेंबर रोजीचा हयातीचा दाखला सादर करावा लागतो. तो हयातीचा दाखला मुख्यत:
संबंधित निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन धारक ज्या बँकेतून निवृत्ती वेतन
घेतात त्या बँकेमार्फत जिल्हा कोषागारात सादर केला जातो.
कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव विचारात घेऊन
राज्य शासनाने निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना हयातीचा दाखला सादर
करण्यासाठी दिनांक 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर, 2020 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन
धारकांनी हयातीचा दाखला सादर करण्यासाठी संबंधित बँकेशी संपर्क करावा, असे आवाहन
जिल्हा कोषागार अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment