05 November, 2020

शासकीय परिसरात सभा, मिरवणूक, आंदोलन, मोर्चा व निवडणूक प्रचारासाठी निर्बंध

 


            हिंगोली, दि. 5 : भारत निवडणूक आयोगाने दि. 2 नोव्हेंबर, 2020 रोजी 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2020 चा कार्यक्रम घोषित केला असून, कार्यक्रम घोषित केल्‍याच्‍या दिनांकापासून आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ  निवडणुकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हादंडाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तालुका दंडाधिकारी कार्यालय तसेच सर्व शासकीय, निम शासकीय संस्था आणि शासकीय विश्रागृहाच्या आवारामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांने किंवा त्यांच्या प्रतिनिधी किंवा त्यांच्या हितचिंतकांने सभा घेणे, सदरील आवाराचा वापर राजकीय कामासाठी करणे किंवा रॅली काढणे, निवडणूक संबंधित पोस्टर्स, बॅनर, पॉम्पलेट, कटआउट, पेंटींग्ज, होर्डिंग्ज, निवडणूक विषयक घोषवाक्य लिहिणे किंवा सदरील आवारात निवडणूक विषयक घोषणा देणे किंवा मतदाराला प्रलोभन दाखविणे, आणि निवडणुकीच्या कामात बाधा निर्माण होईल अशी कृती करणे इत्यादी बाबी नियंत्रित करणे आवश्यक असल्याने जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी फौजदारी प्रक्रिया संहीता 1973 चे कलम 144 अन्वये त्यांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन या आदेशाद्वारे वरील ठिकाणी वरील प्रमाणे कृती करण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण हाई पर्यंत निर्बंध घालीत आहे.

हे आदेश दि. 7 डिसेंबर, 2020 रोजीच्या 23.00 वाजेपर्यंत संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात लागू राहतील, असे जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

******

No comments: