हिंगोली,दि. 19: राष्ट्रीय
कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात 1 डिसेंबर ते 28 फेब्रुवारी 2021
या कालावधीत सक्रिय
कुष्ठ रुग्ण शोध व नियमित संनियत्रण मोहिम राबविण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने पुर्वनियोजनासाठी जिल्हाधिकारी
कार्यालयातील सभागृहात जिल्हा समन्वय समितीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिपचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार,
जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा
आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी
पवार, सहायक संचालक कुष्ठरोग डॉ. राहुल गिते यांची उपस्थिती होती.
जिल्ह्यात
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन अंतर्गत जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील 380
गावातील 6 लाख 72 हजार 355 नागरिकांची आशा वर्कर आणि आरोग्य सेवक-स्वयंसेवक मार्फत
तपासणी करुन नवीन कुष्ठरुग्ण शोधून त्यांच्यावर पूर्ण कालावधीपर्यंत मोफत औषधोपचार
करण्यात येणार आहे. समाजातील कुष्ठरोगाबाबत गैरसमज
कमी करता यावे, यासाठी जिल्ह्यात 1 डिसेंबर, 2020 ते 28 फेब्रुवारी, 2021 या
कालावधीत राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमातंर्गत सक्रिय कुष्ठरुग्ण शोध व
नियमित संनियत्रण सर्वक्षण मोहिम राबविण्यात येणार आहे. नवीन विना विकृती संशयीत
कुष्ठरोगी तसेच नवीन विकृत व असंसर्गीत कुष्ठरुग्णांचा शोध घेण्यात येणार आहे.
यावेळी सदर कुष्ठरोग कार्यक्रमात मदत करणारे त्वचारोग तज्ज्ञ डॉ. शिवाजी गिते
यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी उप विभागीय आरोग्य अधिकारी, तालुका
आरोग्य अधिकारी, सामाजिक संस्थाचे प्रतिनीधी आदींची उपस्थिती होती.
****
No comments:
Post a Comment