हिंगोली,दि.26: कोरोनाचा
प्रादुर्भाव पुन्हा उद्भवण्याची शक्यता असल्याने घ्यावयाची खबरदारी तसेच
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळा सुरु करण्यासाठी करण्यात येणाऱ्या
उपाययोजनांची माहिती नागरिकांना देण्याकरीता जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी हे फेसबुक
लाईव्हच्या माध्यमातून जिल्ह्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत.
जिल्हा
माहिती कार्यालय, हिंगोली यांच्या फेसबुक पेजच्या माध्यमातून जिल्हाधिकारी रुचेश
जयवंशी नागरिकांशी शुक्रवार, दि. 27 नोव्हेंबर, 2020 रोजी सायंकाळी 04.30 वाजता
संवाद साधणार आहेत.
जिल्ह्यात
कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनांकरीता जिल्हा प्रशासन काय करत आहे ? येणाऱ्या
कालावधीत नागरिकांनी कोणत्या निर्देशाचे पालन करावयाचे आहे. आपात्कालीन कालावधीत
नागरिकांना कोणत्या माध्यमातून मदत मिळेल, याबरोबरच संवाद कार्यक्रमाच्या दरम्यान
‘जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली ’ या फेसबुक पेजच्या कंमेन्ट बॉक्सच्या
माध्यमातून नागरिकांना आपल्या अडचणी, उपयुक्त सूचना व प्रश्न जिल्हाधिकारी रूचेश
जयवंशी यांना विचारता येणार असून जिल्हाधिकारी या प्रश्नांना उत्तरे देखील देणार
आहेत.
नागरिकांनी
आपल्या सूचना किंवा प्रश्न पाठविताना आपले ठिकाण व तालुका आवर्जून नमूद करावा. येणाऱ्या
कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी हिंगोलीकरांनी या फेसबुक लाईव्ह संवाद
कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन
नवीन नियम व उपाययोजनाबाबत माहिती करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत
करण्यात येत आहे.
****
No comments:
Post a Comment