हिंगोली,दि. 09 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,
हिंगोली अंतर्गत दि. 11 नोव्हेंबर, 2020 रोजी सकाळी 11.00 ते 12.00 या वेळेत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम
योजना या विषयावरर ऑनलाईन वेबीनारच्या माध्यमातून समुपदेशन व करिअर मार्गदर्शन सत्राचे
आयोजन गुगल मिट (Google meet) वर URL : https://meet.google.com/oef-czso-sek
या लिंकवर आयोजित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना या
विषयावर हिंगोली येथील जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक एस.एम.कादरी हे समुपदेशन
करणार आहेत.
त्याअनुषंगाने पुढील मार्गदर्शक
सुचनांचे पालन करावे. https://meet.google.com/oef-czso-sek
या लिंकवर क्लिक करावे. आपल्याकडे Google meet app यापूर्वी install केलेले नसेल तर
install करुन घ्यावे. आपण Google meet app मधून कनेक्ट झाल्यानंतर Ask to join वर क्लिक
करावे. वेळेपूर्वी 10 मिनिटे अगोदर जॉईन करावे. या सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी दिलेल्या
लिंक मधून कनेक्ट झाल्यावर लगेच आपला व्हिडिओ व माईक बंद करावा. सत्राच्या शेवटी काही
प्रश्न विचारावयाचे असल्यास माईक सुरु करुन विचारावे व लगेच माईक बंद करण्याची दक्षता
घ्यावी. प्रश्न विचारतांना मोजक्या शब्दात विचारावेत.
या वेबीनार बाबत काही अडचण आल्यास
02456-224574 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास
रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्र.सो. खंदारे यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment