हिंगोली,दि. 19: सन
2025 पर्यंत संपुर्ण देश क्षयरोग मुक्त करण्यासाठी केंद्र शासनाने धोरण निश्चित
केले असुन, त्याअनुषंगाने जिल्ह्यातील क्षयरोग रुग्णांचा शोध घेवून त्याच्यांवर
योग्य ते उपचार करुन जिल्हा क्षयरोग मुक्त करण्याच्या दृष्टीकोनातुन क्षयरोग
दूरीकरण कार्यक्रमाचे नियोजन करुन राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी
यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय टि.बी. फोरम बैठकीत
जिल्हाधिकारी श्री. जयवंशी हे बोलत होते. यावेळी जिपचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी
अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा शल्य चिकीत्सक अधिकारी डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा
आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी
पवार, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. राहुल गिते यांची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. जयवंशी म्हणाले की, जिल्ह्यातील क्षयरोगाने ग्रस्त
असलेले रुग्ण शोधुन त्यांच्यावर उपचार करण्यासाठी ‘राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण
कार्यक्रम’ राबविण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम राबवितांना कोरानाचे रुग्ण शोधुन
त्यांच्यावर उपचार करण्यासाठी ज्या सुत्राचा (फॉर्म्युला) वापरला होता. तोच
क्षयरोग रुग्ण शोधण्याकरीता वापरावा. जेणेकरुन क्षय रोगी सापडतील आणि सामुदायिक
संसर्ग रोखण्यास यश मिळेल. तसेच सापडलेल्या रुग्णांना औषधोपचारांचा कोर्स पूर्ण
करण्यास प्रवृत्त करावे. तसेच क्षयरोग रुग्णांना प्रतीमहा रु. 500/- पोषण आहार
भत्याची रक्कम थेट बँकेत जमा करण्याचे निर्देश संबंधीत बँक अधिकारी यांना यावेळी दिले.
क्षयरोग मुक्त झालेले रुग्णांनी जास्तीत-जास्त क्षयरोग रुग्णांना औषध उपचार करुन
हा रोग पूर्णपणे बरा होतो याकरीता प्रबोधन करावे. क्षयरोग रुग्णांना व त्यांच्या
कुटूंबीयाची सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करुन त्याचे योग्य पूनवर्सन करण्याचे
निर्देश जिल्हाधिकारी जयवंशी यांनी संबंधितांना दिले.
यावेळी योग्य औषधोपचार घेवून क्षयरोगावर यशस्वी मात करणाऱ्या नागरिकांचा तसेच सदर
क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमात मदत करणाऱ्या खाजगी डॉक्टरांचा यावेळी सत्कार करण्यात
आला. यावेळी उप विभागीय आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, सामाजिक संस्थाचे
प्रतिनीधी आदींची उपस्थिती होती.
****
No comments:
Post a Comment