हिंगोली, दि. 5 : भारत निवडणूक
आयोगाने दि. 2 नोव्हेंबर, 2020 रोजी 05-औरंगाबाद
विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2020 चा कार्यक्रम घोषित केला असून, कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून
आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व पारदर्शक
वातावरणात पार पडण्याच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यात कसल्याही प्रकारचे जात,
भाषा, धार्मिक शिबिरांचे, मेळाव्यांच्या आयोजनावर प्रतिबंध घालणे आवश्यक असल्याने जिल्हादंडाधिकारी
रुचेश जयवंशी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये त्यांना
प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे.
हे आदेश दि. 7 डिसेंबर, 2020 रोजीच्या 23.00
वाजेपर्यंत संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात लागू राहतील, असे जिल्हादंडाधिकारी रुचेश
जयवंशी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment