हिंगोली, दि. 5 : भारत निवडणूक
आयोगाने दि. 2 नोव्हेंबर, 2020 रोजी 05-औरंगाबाद
विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2020 चा कार्यक्रम घोषित केला असून, कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून
आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व पारदर्शक
वातावरणात पार पडण्याच्या दृष्टीकोनातून राजकीय पक्षांनी, निवडणुक लढविणाऱ्या
उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकाने,
मुद्रणालयाचे मालकाने व इतर सर्व माध्यमाद्वारे छपाई करणाऱ्या मालकाने तसेच
प्रकाशकाने नमुना मतपत्रिका छापताना काही निर्बंध घालण्याची आवश्यकता
असल्याने जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी
यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये त्यांना प्रदान करण्यात
आलेल्या शक्तीचा वापर करुन प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे.
यामध्ये
इतर उमेदवाराचे नाव व त्यांनी नेमून देण्यात आलेले चिन्ह वापरणे, नमुना
मतपत्रिकेसाठी आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे कागद वापरणे, आयोगाने निश्चित
केलेल्या कागदाच्या आकारामध्ये नमुना मतपत्रिका छापणे इत्यादी बाबींवर निर्बंध
घातले आहेत.
हे आदेश दि. 7 डिसेंबर, 2020 रोजीच्या 23.00
वाजेपर्यंत संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात लागू राहतील, असे जिल्हादंडाधिकारी रुचेश
जयवंशी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment