· 73 रुग्णांवर उपचार सुरु
हिंगोली,दि.
03 : जिल्ह्यात 05 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा
शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.
आज प्राप्त झालेल्या
अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसरात 05 व्यक्ती कोविड-19
पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 15 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना
डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये
भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 18 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने
त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर कोविड-19 च्या 01 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर
असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण 19 रुग्णांची
सद्य:स्थितीत प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु
आहेत.
जिल्ह्यात
आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 3 हजार 130 रुग्ण झाले असून, त्यापैकी 3 हजार 07 रुग्ण
बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 73
रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 50 व्यक्तींचा
मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले
आहे.
****
No comments:
Post a Comment