· जिल्ह्यातील
16 हजार 276 मतदारांसाठी 39 मतदान केंद्रावर मतदान होणार
हिंगोली,दि.03: भारत निवडणूक आयोगाने दिनांक 2 नोव्हेंबर, 2020 रोजी 05-औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ
निवडणूक कार्यक्रम -2020 जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील सर्व
शासकीय अधिकारी-कर्मचारी यांनी आदर्श आचारसंहितेची अमंलबजावणी करावी, असे निर्देश
जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सर्व नोडल अधिकारी व विभाग
प्रमुखांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी जयवंशी बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक
राकेश कलासागर, अतिरिक्त जिल्हाधिकारी शंकर बर्गे, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप
शेंगुलवार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत
सुर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गोविंद रणवीरकर यांच्यासह औरंगाबाद पदवीधर
मतदार संघ निवडणुकीसाठी नियुक्त केलेले नोडल अधिकारी व विभाग प्रमुख उपस्थित होते.
जिल्हा निवडणूक अधिकारी जयवंशी पुढे म्हणाले की, औरंगाबाद विभाग
पदवीधर मतदारसंघ निवडणूक प्रक्रिया ही लोकसभा-विधानसभा निवडणूक प्रक्रियेसारखीच
आहे. त्यामुळे त्या निवडणूकीसाठी भारत निवडणूक आयोगाने ज्या पध्दतीने आदर्श
आचारसंहिता लागू केली होती. त्याच पध्दतीने या निवडणूकीसाठी सर्व शासकीय
यंत्रणेतील अधिकारी -कर्मचाऱ्यांनी आदर्श आचारसंहितेची अमंलबजावणी करावी अशा सूचना
दिल्या.
तसेच या निवडणुकीच्या अनुषंगाने विविध पथकांची व कक्षांची निर्मिती
करण्यात आली असून संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर सोपविलेली जबाबदारी
अत्यंत चोखपणे पार पाडून ही निवडणूक प्रक्रिया यशस्वी करावी, असे निर्देश
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले. त्याप्रमाणेच सद्या राज्यात कोवीड साथ
रोगाचा प्रादूर्भाव असून या कोविड महामारीच्या कालावधीत होणारी ही पहिलीच निवडणूक
आहे. त्यामूळे सर्व संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कोवीडच्या मार्गदर्शक सूचनांचे
पालन करुन दिलेली जबाबदारी पार पाडावी अशा सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.
या निवडणूकीसाठी जिल्ह्यात एकूण 16 हजार 276 मतदार आहेत. जिल्ह्यातील
39 मतदान केंद्रावर प्रक्रिया होणार आहे. अद्यापपर्यंत ज्या शासकीय-निमशासकीय
कार्यालयात अधिकारी-कर्मचारी पदवीधर मतदार म्हणून नोंदणी केली नाही त्यांनी दि. 05
नोव्हेंबर, 2020 पूर्वी मतदार म्हणून नोंदणी
करावी. तसेच आचारसंहिता कालावधीत कोणतेही शासकीय कार्यक्रम, उद्घाटन, भूमीपूजन
करता येणार नाहीत. अधिकारी-कर्मचाऱ्यांना जिल्हा दौऱ्यावर येणारे मंत्री यांना
भेटता येणार नाही या सर्व बाबींची योग्य ती दक्षता घेऊन आचारसंहितेचा भंग होणार
नाही याची काळजी घ्यावी, असे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सूचित केले.
तसेच दिनांक 2 नोव्हेंबर, 2020 ते 7 डिसेंबर, 2020 या कालावधीत
औरंगाबाद पदवीधर मतदार संघाची आदर्श आचारसंहिता लागू झाल्याची माहिती दिली. या
निवडणूकीसाठी 16 हजार 276 मतदार असून यात पुरुष मतदार 13 हजार 196, स्त्री मतदार 03
हजार 80 इतकी आहे. जिल्हयातील 39 मतदान कंद्रावर मतदान होणार असून यासाठी 12 क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असल्याची माहिती त्यांनी दिली. या निवडणूकीसाठी जिल्हास्तरावर अप्पर जिल्हाधिकारी हिंगोली तसेच
तालुकास्तरावर संबंधीत तहसिलदार यांच्या नियत्रणाखाली आदर्श आचार संहिता कक्षाची
स्थापना करण्यात आली आहे. आदर्श आचार संहितेची अंमलबजावणी करण्यासाठी
तालुकास्तरावर भरारी पथके, व्हिडीओ संनिरीक्षण पथके आणि व्हिडीओ चित्रिकरण तपासणी
पथके स्थापन करण्यात आली आहेत.
या निवडणूकीसाठी 48 मतदान केंद्राध्यक्ष, 144 मतदान अधिकारी, 96
आरोग्य कर्मचारी आणि 48 इतर कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून 05-औरंगाबाद विभाग पदवीधर
मतदारसंघ निवडणूक-2020 ही बॅलेट पेपरवर घेण्यात येणार असून त्यासाठी जिल्हास्तरावर
एकूण 162 जम्बो लोखंडी मतपेट्यांचे नियोजन केले असून या मतपेट्या सुस्थितीत
असल्याबाबत पडताळणी करुन तयार ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी
यांनी देऊन सर्व नोडल अधिकाऱ्यांना निवडणुक कालावधीत पार पाडवयाची जबाबदारीची
माहिती यावेळी दिली.
05-औरंगाबाद
पदवीधर मतदार संघ
निवडणूक कार्यक्रम पूढील प्रमाणे आहे.
अधिसूचना
जाहीर करणे दि. 5 नोव्हेंबर,2020 (गुरुवार), नामनिर्देशन पत्र भरण्याचा अंतिम
दिनांक 12 नोव्हेंबर, 2020 (गुरुवार), नामनिर्देशन पत्राची छाननी दि. 13
नोव्हेंबर, 2020 (शुक्रवार), उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 17
नोव्हेंबर, 2020 (मंगळवार), मतदानाचा दिनांक 01 डिसेंबर, 2020 (मंगळवार), मतदानाची
वेळ सकाळी 08.00 ते सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत. मतमोजणी दिनांक
03 डिसेंबर, 2020 (गुरुवार), निवडणूक प्रक्रिया संपण्याचा दिनांक 07 डिसेंबर, 2020
(सोमवार) राहील.
****
No comments:
Post a Comment