हिंगोली, दि. 06 :
जिल्ह्यात सन 2020 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक ग्रामपंचायत
निवडणुका लक्षात घेता सरपंच पदाचे राज्यस्तरावर जिल्हानिहाय आरक्षण निश्चित केले आहे.
जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यांना तालुकानिहाय ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षणाबाबत
कळविण्यात आले आहे.
तालुकास्तरावर मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच)
निवडणुक नियम 1964 नियम 2-अ (1)(2) अन्वये पुढील पाच वर्षाच्या कालावधीसाठी तालुकास्तरावर
जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या आरक्षित पदाचे वाटप तालुकानिहाय करण्यात आलेले आहे.
सरपंच पदाच्या आरक्षणाची (महिला पदासह) कार्यवाही करण्यासाठी तालुकानिहाय संपर्क अधिकाऱ्यांची
नेमणूक केली आहे.
नेमणूक करण्यात आलेल्या संपर्क अधिकाऱ्यांचे नाव,
तालुका व आरक्षण काढण्याचा दिनांक व वेळ पुढील प्रमाणे आहे.
सेनगाव
व हिंगोली तालुक्यासाठी संपर्क अधिकारी म्हणून हिंगोलीचे उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे
यांची नेमणूक करण्यात आली असून सेनगाव तालुक्याची आरक्षण सोडत दि. 9 नोव्हेंबर,
2020 रोजी व हिंगोली तालुक्याची आरक्षण सोडत दि. 10 नोव्हेंबर, 2020 रोजी दुपारी
12.00 वाजता काढण्यात येणार आहे.
वसमत व औंढा नागनाथ तालुक्यासाठी संपर्क अधिकारी
म्हणून वसमतचे उपविभागीय अधिकारी प्रविण फुलारी यांची नेमणूक करण्यात आली असून वसमत
तालुक्याची आरक्षण सोडत दि. 9 नोव्हेंबर, 2020 रोजी व औंढा नागनाथ तालुक्याची आरक्षण
सोडत दि. 10 नोव्हेंबर, 2020 रोजी दुपारी 12.00 वाजता काढण्यात येणार आहे. तर कळमनुरी
तालुक्यासाठी संपर्क अधिकारी म्हणून कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांची
नेमणूक करण्यात आली असून कळमनुरी तालुक्याची आरक्षण सोडत दिनांक 11 नोव्हेंबर,
2020 रोजी दुपारी 12.00 वाजता काढण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी
यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविली आहे.
****
No comments:
Post a Comment