हिंगोली,
दि. 5 : भारत
निवडणूक आयोगाने दि. 2 नोव्हेंबर, 2020 रोजी 05-औरंगाबाद
विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2020 चा कार्यक्रम घोषित केला असून, कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून
आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय
वातावरणात पार पडण्याच्या दृष्टीकोनातून राजकीय पक्षांनी, निवडणुक लढविणाऱ्या
उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकांनी सार्वजनिक
इमारतीच्या ठिकाणी, सार्वजनिक रस्त्यावर,
निवडणुकीसंबंधी पोस्टर्स, बॅनर्स,
पॉम्प्लेट्स, कटआऊस, होर्डींग्ज कमानी लावणे या व इतर बाबींमुळे रहदारीस अडथळा
निर्माण होऊ शकेल किंवा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे त्यावर प्रतिबंध घालणे आवश्यक असल्याने सर्व संबंधितास नोटीस देवून त्यांचे म्हणणे
ऐकून घेणे सद्य:स्थितीत शक्य नसल्याने जिल्हादंडाधिकारी
रुचेश जयवंशी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33(1) डीबी अन्वये त्यांना
प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे.
हे आदेश दि. 7 डिसेंबर, 2020 रोजीच्या 23.00
वाजेपर्यंत संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात लागू राहतील, असे जिल्हादंडाधिकारी रुचेश
जयवंशी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
***
No comments:
Post a Comment