05 June, 2024
उन्हाळी शिबिरामध्ये श्री स्वामी समर्थ बालगृहातील बालिकांना मार्गदर्शन
हिंगोली (जिमाका), दि. 05 : जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि मिरॅकल फाउंडेशन इंडियाच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली तालुक्यातील खानापूर चित्ता येथील श्री.स्वामी समर्थ बालगृहात प्रवेशित बालिकांसाठी दिनांक 03 जून 2024 रोजी उन्हाळी शिबिराचेआयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये बालगृहातील बालिकांना मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. आर. मगर हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पी. पी. मुळे, गायत्री मुळे, डॉ. मुरलीधर जायभाये उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ.मुरलीधर जायभाये यांनी करियर म्हणजे काय या विषयावर सखोल मार्गदर्शन करताना करिअर निवडताना आपली आवड, कौशल्य, आपल्याला कोणत्या क्षेत्रात करिअर करावयाचे आहे याबाबत योग्य अभ्यास करूनच सावधपणे करिअरची निवड केली पाहिजे, असे उदाहरणासह स्पष्ट केले.
बालकल्याण समितीचे सदस्य परसराम हेंबाडे यांनी बालकांना जीवन जगत असताना त्यांच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या आलेल्या अडचणींना सामोरे जात असताना काय करावे आणि काय करू नये याबाबत मार्गदर्शन केले. तसेच जीवनात यशस्वी होण्यासाठी जिद्द व मेहनत असेल तर यश मिळवणे सोपे असल्याचे स्पष्ट केले.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. आर. मगर यांनी उन्हाळी शिबिराच्या माध्यमातून बालिकांना त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी एक नवीन संधी उपलब्ध होणार आहे, असे सांगून उन्हाळी शिबिरातील बालिकांना तसेच इयत्ता दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व बालिकांना शुभेच्छा दिल्या. श्री. पी.पी.मुळे यांनी उन्हाळी शिबिरामध्ये आयोजित कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा बाल संरक्षण अधिकारी संस्था गणेश मोरे यांनी बालकांसाठी उन्हाळी शिबिर का महत्त्वाचे आहे, उन्हाळी शिबिरामध्ये घेण्यात येणारे उपक्रम व कार्यक्रमाची रूपरेषा याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा बाल संरक्षण कक्षातील सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे व चाइल्ड हेल्पलाइनचे प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, बालकल्याण समिती सदस्या किरण करडेकर, संगीता दुबे, बाली भोसले, बाल न्याय मंडळ सदस्या ॲड. सत्यशीला तांगडे, जिल्हा बाल संरक्षण कक्षातील बाल संरक्षण अधिकारी संस्थाबाह्य जरीबखान पठाण, सरस्वती मुलींचे निरीक्षण गृह व बालगृहातील अधिक्षिका रेखा भुरके, शिक्षक शंकर घ्यार, खाकी बाबा मेमोरियल इंग्लीश स्कूलचे सुभाष नानवटे, नंदकिशोर अहिरे, सचिन पठाडे, अंकूर पाटोडे, बाल गृह अधीक्षक रमेश पवार, बालगृहातील बालकांचे पालक व सर्व प्रवेशित बालके उपस्थित होते.
*******
04 June, 2024
हिंगोली लोकसभा मतदारसंघातून आष्टीकर पाटील नागेश बापूराव विजयी घोषित • नोटाला 3 हजार 123 मतदारांची पसंती
हिंगोली (जिमाका), दि.04 : 15- हिंगोली लोकसभा मतदार संघातून आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उमेदवार आष्टीकर पाटील नागेश बापूराव हे 1 लाख 8 हजार 602 मतांनी विजयी झाल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी घोषित करत त्यांना विजयाचे प्रमाणपत्र प्रदान केले.
यावेळी विशेष मतमोजणी निरीक्षक श्रीमती एम. एस. अर्चना, एम. पी. मारोती, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे यांच्यासह निवडणूक यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.
विजयी उमेदवार श्री. आष्टीकर यांनी 26 व्या फेरीअखेरीस टपाली मतदानासह त्यांना 4 लाख 92 हजार 535 मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार दुस-या क्रमांकावर बाबुराव कदम कोहळीकर यांना 3 लाख 83 हजार 933 मते मिळाली. तर तिस-या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. बी. डी. चव्हाण यांना 1 लाख 61 हजार 814 मते मिळाली.
गजानन धोंडबा डाळ (बहुजन समाज पार्टी) यांना 7,465, विजय रामजी गाभणे (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्ससिस्ट) यांना 14,644, अनिल देवराव मोहिते (अखिल भारतीय परिवार पार्टी) यांना 3,374, ॲड. अलताफ अहेमद (इंडियन नॅशनल लीग) यांना 2,950, देवसरकर वर्षा शिवाजीराव (बहुजन मुक्ती पार्टी) यांना 4,099, देशा श्याम बंजारा (समनक जनता पार्टी) यांना 2,063, प्रकाश मेशराम रणवीर (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया-ए) यांना 2,102, रवी रामदास जाधव-सवनेकर (अभिनव भारत जनसेवा पक्ष) यांना 1,602, सुनिल दशरथ इंगोले (भीमसेना) यांना 1,027, हेमंत राधाकिशन कनाके (राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी) यांना 1,800, त्रिशला मिलिंद कांबळे (बहुजन समाज पार्टी-आंबेडकर) यांना 2,150, अशोक पांडुरंग राठोड (अपक्ष) यांना 2,906, आनंद राजाराम धुळे (अपक्ष) यांना 9,817, अंबादास सुकाजी गाडे (अपक्ष) यांना 14,742, अ. कदिर मस्तान सय्यद (गोरेगावकर) (अपक्ष) यांना 3,713, दत्ता श्रीकृष्ण सूर्यवंशी (अपक्ष) यांना 7,239, देवजी गंगाराम आसोले (अपक्ष) यांना 1,483, बाबुराव आनंदराव कदम (अपक्ष) यांना 4,482, भवर गोविंदराव फुलाजी (अपक्ष) यांना 2,146, महेश कैलास नप्ते (अपक्ष) यांना 2,299, ॲड. रवि शिंदे (अपक्ष) यांना 2,701, रामप्रसाद नारायण बांगर (अपक्ष) यांना 4,525, ॲड. रामराव आत्माराम जुंबडे (अपक्ष) यांना 2,103, वसंत किसन पाईकराव (अपक्ष) यांना 593, विजय ज्ञानबा राऊत (अपक्ष) यांना 1,126, विश्वनाथ भाऊराव फाळेगावकर (अपक्ष) यांना 1,859, ॲड. शिवाजीराव जाधव (अपक्ष) यांना 2,214, सत्तार पठाण (अपक्ष) यांना 2,463, सर्जेराव निवृत्ती खंदारे (अपक्ष) यांना 5,014आणि सुनिल मोतीराम गजभार (अपक्ष) यांना 3,192 तर नोटाला 26 व्या फेरीअखेरीस टपाली मतदानासह 3,123 मतदारांनी पसंती दर्शविली असून 11 लाख 59 हजार 298 मते वैध ठरली आहेत. अवैध मते 446 आणि 15 टेंडर मते पडली असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी घोषित केले आहे.
या निवडणूक प्रक्रियेत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीमती मेघना कावली, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, सहायक निवडणूक अधिकारी क्रांति डोंबे, डॉ. सखाराम मुळे, डॉ. सचिन खल्लाळ, अविनाश कांबळे, उपजिल्हाधिकारी समाधान घुटुकडे, उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांच्यासह सर्व पथकप्रमुख सहभागी झाले होते. 15- हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात म्हणजे 26 एप्रिल 2024 रोजी मतदान पार पडले होते.
******
03 June, 2024
मतमोजणीसाठी नियुक्त निरीक्षकांनी केली मतमोजणी केंद्राची पाहणी
• निवडणूक यंत्रणा सज्ज
• सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात
• चोख सुरक्षा व्यवस्थेत होणार मतमोजणी
• मतमोजणी केंद्रात मोबाईलला बंदी
हिंगोली (जिमाका), दि. 03 : 15-हिंगोली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतमोजणीसाठी नियुक्त मतमोजणी निरीक्षक श्रीमती एम. एस. अर्चना आणि श्री. एम. पी. मारुती यांनी मतमोजणी केंद्राची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रत्येक मतमोजणी कक्षातील व्यवस्थेची माहिती घेतली. तसेच जिल्हा निवडणूक यंत्रणेने केलेल्या तयारीबाबत समाधान व्यक्त केले.
यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीमती मेघना कावली, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, सहायक निवडणूक अधिकारी क्रांति डोंबे, डॉ. सखाराम मुळे, डॉ. सचिन खल्लाळ, अविनाश कांबळे, उपजिल्हाधिकारी समाधान घुटुकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी. जी. पोत्रे यांच्यासह यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.
मतमोजणी निरीक्षक श्रीमती एम. एस. अर्चना आणि श्री. एम. पी. मारुती यांनी उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी यांची आसनव्यवस्था, विधानसभा क्षेत्रनिहाय तयार करण्यात आलेले सहा मतमोजणी कक्ष, टपाली मतमोजणी कक्ष, ईटीपीबीएमएस कक्ष, एनकोअर कक्षाची पाहणी केली. तसेच याठिकाणी मतमोजणीसाठी करण्यात आलेल्या सज्जतेचा आढावा घेतला.
तसेच टपाली मतमोजणी कक्षाला भेट दिल्यानंतर इन्कोअर अँप, ईटीपीबीएस आणि टँब्युलेशन शीटबाबात मतमोजणी निरीक्षकांनी जिल्हा सूचना अधिकारी बारी सिद्दिकी यांच्याकडून माहिती जाणून घेतली.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मतमोजणी निरीक्षकांना केंद्रातील यंत्रणेबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी येथील माध्यम कक्षाला भेट दिली. माध्यम कक्षात माध्यम प्रतिनिधींना मतमोजणीची उमेदवारांना पडलेली फेरीनिहाय मतांची तात्काळ माहिती व्हावी, तसेच देशभरातील मतदार संघाचे निकाल पाहता यावेत, यासाठी तशी सुविधा पुरविण्यात येणार आहे.
निवडणूक आयोग किंवा यंत्रणेकडून प्राप्त सुरक्षा पासधारकांनाच मतमोजणी केंद्रात प्रवेश मिळणार आहे. येथे तीन स्तरीय सुरक्षा यंत्रणा तैनात असून, मतमोजणी निरीक्षक, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांना मोबाईल वापरता येणार असून, इतरांना मोबाइल बंदी आहे.
वैद्यकीय कक्ष स्थापन
मतमोजणी केंद्र परिसरात मतमोजणी प्रक्रियेत सहभागी अधिकारी - कर्मचारी, किंवा उमेदवार वा त्यांचे प्रतिऩिधींचे आरोग्य बिघडल्यास त्यांना तात्काळ उपचार मिळावेत, यासाठी येथे वैद्यकीय कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आगीसारखी घटना घडू नये यासाठी अग्निशामक दलाकडून येथे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कम्युनिकेशन हॉलचीही येथे व्यवस्था उभारण्यात आली आहे.
94 टेबलवर होणार मतमोजणी
हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी व हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड आणि नांदेड जिल्ह्यातील किनवट व हदगाव असे एकूण सहा विधानसभा क्षेत्र या लोकसभा मतदारसंघात आहेत. एका विधानसभा मतदारसंघासाठी 14 टेबल असे एकूण 84 टेबलवर मतमोजणी होणार आहे. याशिवाय पोस्टल बॅलेटसाठी 8 आणि ईटीपीबीएससाठी 2 टेबल आहेत. थोडक्यात हिंगोली लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी 94 टेबलवर होणार आहे.
एकूण मतदार व प्रत्यक्षात झालेले मतदान
हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे मतदान हे दुस-या टप्प्यात 26 एप्रिल 2024 रोजी 2008 मतदान केंद्रांवर पार पडले. या मतदारसंघामध्ये 18 लाख 17 हजार 734 मतदार आहेत. त्यापैकी 9 लाख 46 हजार 674 पुरुष, 8 लाख 71 हजार 035 महिला तर 25 तृतीयपंथीय मतदारांचा समावेश आहे. या एकूण मतदारांपैकी 6 लक्ष 28 हजार 302 पुरुष, 5 लक्ष 26 हजार 644 महिला तर 9 तृतीयपंथीय अशा एकूण 11 लक्ष 54 हजार 955 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये पुरुष 66.37, महिला 60.46 आणि 36 टक्के तृतीयपंथीय मतदारांची टक्केवारी राहिली आहे. 15 - हिंगोली लोकसभा मतदारसंघात 63.54 टक्के मतदान पार पडले आहे.
विधानसभा निहाय मतमोजणी फेरी
15- हिंगोली लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदार संघनिहाय मतमोजणीच्या फेऱ्या वेगवेगळ्या राहणार आहेत. यामध्ये उमरखेड 25, किनवट 24, हदगाव विधानसभा मतदार संघासाठी मतमोजणीच्या 23 फेऱ्या होतील. तर वसमत 24, आणि कळमनुरी व हिंगोली विधानसभा मतदार संघासाठी प्रत्येकी 25 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे.
*******
बाळाच्या लसीकरण नोंदणीसाठी युविन पोर्टल नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 03 : भारत सरकारने संपूर्ण देशभरात नियमित लसीकरणासाठी युविन पोर्टलची निर्मिती केलेली आहे. नियमित लसीकरण हे युविन पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन राबविण्यात येत आहे.
बाळाचे लसीकरण नोंदणी https/uwinselfregistration mohfw.gov.in/login या लिंकचा वापर करून घरी बसून करता येईल. यासाठी आपणास गुगलवरील उपरोक्त दिलेल्या लिंकवर बालकांच्या लसीकरणाची नोंदणी करावी. तसेच घराजवळ असलेल्या जवळच्या लसीकरण सत्राची निवड करावी. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपण निवड केलेल्या लसीकरण स्थळी जाऊन बालकांचे लसीकरण पूर्ण करून घ्यावे.
या लसीकरणांमध्ये बीसीजी, पोलिओ, आयपीव्ही, पीसीव्ही, पेंटा, एमआर आणि विटामिन ए व बूस्टर डोस देण्यात येत आहे. जेणेकरून पोलिओ, क्षयरोग, डांग्या खोकला, घटसर्प, धनुर्वात, गोवर रूबेला, अतिसार आणि मेंदूज्वर या आजारापासून बाळ सुरक्षित राहील आणि भावी पिढी सुदृढ व निरोगी बनेल. युविन प्री रजिस्ट्रेशनचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगूलवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सुनील देशमुख यांनी केले आहे.
******
मतमोजणी परिसरात 4 जून रोजी 144 कलम लागू
हिंगोली (जिमाका), दि. 03 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुषंगाने 15-हिंगोली लोकसभा मतदारसंघात 26 एप्रिल, 2024 रोजी मतदान झाले. मतमोजणी दि. 4 जून 2024 रोजी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, लिंबाळा मक्ता, हिंगोली येथे विधानसभानिहाय सकाळी 8 वाजेपासून होणार आहे.
त्यानुषंगाने जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मतमोजणीच्या ठिकाणी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आले असल्याचे आदेशात नमूद केले आहे.
मतमोजणीच्या केंद्राच्या ठिकाणापासून 200 मीटर परिसरात सर्व पक्ष कार्यालय, उमेदवारांचे मंडप, सर्व दुकाने, मोबाईल, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे, इलेक्ट्रॉनिक्स स्मार्ट वॉचेस, निवडणूकीच्या कामाव्यतिरिक्त खाजगी वाहन व निवडणूक कामाव्यतिरिक्त व्यक्तीस प्रवेश प्रतिबंध करण्यात आला आहे.
हे आदेश निवडणुकीची कामे हाताळतांना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून दि. 4 जून 2024 रोजी सकाळी 6.00 वाजेपासून ते मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया संपेपर्यंत अंमलात राहणार असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कळविले आहे.
*****
02 June, 2024
हिंगोली लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्यात
• हिंगोली लोकसभा मतदारसंघाची ९४ टेबलवर होणार मतमोजणी
* सकाळी ८ वाजता मतमोजणीला प्रारंभ
* श्रीमती एम. एस. अर्चना व एम. पी. मारोती विशेष मतमोजणी निरीक्षक
* ६३.५४ टक्के मतदान
हिंगोली दि.०२(जिमाका) : हिंगोली लोकसभा मतदार संघाची मंगळवारी होणाऱ्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, लिंबाळा मक्ता येथील परिसरात सर्व मतयंत्र स्ट्रॉंगरूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आले असून याच ठिकाणी मतमोजणी सकाळी आठ वाजतापासून सुरू होणार आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर व त्यांच्या अधिनस्त वरिष्ठ अधिकारी यासंदर्भात दररोज आढावा बैठका, प्रशिक्षण घेत असून सोमवारी दुपारपर्यंत सर्व पायाभूत सुविधा या ठिकाणी पूर्णतः कार्यरत होणार आहेत.
मतमोजणी करताना आवश्यक असणारा राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचा सहभाग, माध्यमांचा सहभाग, निवडणूक निरीक्षक आणि भारत निवडणूक आयोगाला तातडीने देण्यात येणारी माहिती, यासाठी आवश्यक पूरक तांत्रिक व भौतिक यंत्रणा या परिसरात उभारण्यात येत आहे.
सध्या शासकीय तंत्रनिकेतन, महाविद्यालय, लिंबाळा मक्ता येथे असणाऱ्या स्ट्रॉंग रूमसाठी तीन स्तरीय सुरक्षा यंत्रणा तैनात आहे. प्रवेशिका व तपासणी प्रक्रियेशिवाय या ठिकाणी कोणालाही प्रवेश नाही. दर्शनी भागात सर्व स्ट्रॉंग रूममधील सीसीटीव्ही कॅमेरे २४ तास सुरू असून, मतदान झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून या ठिकाणी सील लावण्यात आले आहे. स्ट्रॉंग रूममध्ये कोणालाही प्रवेश नसतो. तसेच २४ तास कॅमेऱ्याच्या माध्यमातून निगराणी केली जाते.
आवश्यक मनुष्यबळ नियुक्त
मतदान प्रक्रियेच्या तुलनेत मतमोजणी प्रक्रियेसाठी कमी कर्मचारी लागतात. त्यामुळे आवश्यक तेवढे मनुष्यबळ या सर्व प्रक्रियेमध्ये सहभागी असेल. तेवढेच पोलीस अधिकारी-कर्मचारी सुरक्षा यंत्रणेसंदर्भात काम करणार आहेत.
८ वाजता मतमोजणीला प्रारंभ
सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ होईल. प्रथम पोस्टल बॅलेट पेपर व या वर्षी घरी जाऊन घेण्यात आलेल्या दिव्यांग व ८५ वर्षावरील ज्येष्ठांच्या मतदानाची मोजणी होणार आहे; त्यानंतर एकाच वेळी सहा मतदारसंघातील मतमोजणीला प्रारंभ होईल.
मतमोजणी संदर्भातील प्रक्रिया ही निवडणूक आयोगाच्या निर्देशित सूत्रानुसार व सूचनेनुसार चालते, यासाठी निवडणूक विभागाकडून नेमणूक करण्यात आलेले विशेष मतमोजणी निरीक्षक श्रीमती एम. एस. अर्चना आणि एम. पी. मारोती, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर व त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणेत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतमोजणी प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. मंगळवारी ४ जूनच्या सायंकाळपर्यंत सर्व फेऱ्यांची मतमोजणी पार पडण्याची शक्यता आहे.
९४ टेबलवर होणार मतमोजणी
हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी व हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड आणि नांदेड जिल्ह्यातील किनवट व हदगाव असे एकूण सहा विधानसभा क्षेत्र या लोकसभा मतदारसंघात आहेत. एका विधानसभा मतदारसंघासाठी १४ टेबल असे एकूण ८४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. याशिवाय पोस्टल बॅलेटसाठी ८ आणि ईटीपीबीएससाठी २ टेबल आहेत. थोडक्यात हिंगोली लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी ९४ टेबलवर होणार आहे.
हे कर्मचारी करतात मतमोजणी
प्रत्येक टेबलवर चार कर्मचारी असतात. यामध्ये मायक्रो ऑब्झर्व्हर म्हणजे सूक्ष्म निरीक्षक, दुसरे सुपरवायझर म्हणजे मतमोजणी पर्यवेक्षक, तिसरा काउंटिंग असिस्टंट म्हणजे मतमोजणी सहाय्यक आणि चौथा असतो एक शिपाई सहाय्य करण्यासाठी.
यामधील सूक्ष्म निरीक्षक हे बँकेचे कर्मचारी असतात. सुपरवायझर हे साधारणतः अभियंते असतात. हिशेब ठेवण्यासाठी लागणारे मतमोजणी सहाय्यक महसूल विभागाचे तलाठी असतात व यांना पेट्या आणून देण्यासाठी प्रत्येक टेबलवर एक शिपाई तैनात असतो.
मतदार व प्रत्यक्षात झालेले मतदान
हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे मतदान हे दुस-या टप्प्यात २६ एप्रिल २०२४ रोजी २००८ मतदान केंद्रांवर पार पडले. या मतदारसंघामध्ये १८ लाख १७ हजार ७३४ मतदार आहेत. त्यापैकी ९ लाख ४६ हजार ६७४ पुरुष, ८ लाख ७१ हजार ०३५ महिला तर २५ तृतीयपंथीय मतदारांचा समावेश आहे. या एकूण मतदारांपैकी ६ लक्ष २८ हजार ३०२ पुरुष, ५ लक्ष २६ हजार ६४४ महिला तर ९ तृतीयपंथीय अशा एकूण ११ लक्ष ५४ हजार ९५५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये पुरुष ६६.३७, महिला ६०.४६ आणि ३६ टक्के तृतीयपंथीय मतदारांची टक्केवारी राहिली आहे. १५ - हिंगोली लोकसभा मतदारसंघात ६३.५४ टक्के मतदान पार पडले आहे.
विधानसभा निहाय मतमोजणी फेरी
१५- हिंगोली लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदार संघनिहाय मतमोजणीच्या फे-या वेगवेगळ्या राहणार आहेत. यामध्ये उमरखेड २५, किनवट २४, हदगाव विधानसभा मतदार संघासाठी मतमोजणीच्या २३ फे-या होतील. तर वसमत २४, आणि कळमनुरी व हिंगोली विधानसभा मतदार संघासाठी प्रत्येकी २५ फे-यांमध्ये मतमोजणी होणार आहे.
*****
01 June, 2024
हिंगोली लोकसभा मतदार संघासाठी दोन विशेष मतमोजणी निरीक्षकांची नियुक्ती
* श्रीमती एम.एस. अर्चना यांच्याकडे वसमत, कळमनुरी, हिंगोली तर एम. पी. मारोती यांच्याकडे उमरखेड, किनवट आणि हदगाव विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी
हिंगोली, दि.०१ (जिमाका): भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १८व्या लोकसभेसाठीच्या मतदानाची निवडणूक प्रक्रिया पार पडली असून, मंगळवारी (दि.४) सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. १५- हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाकडून श्रीमती एम. एस. अर्चना आणि एम. पी. मारोती यांची विशेष मतमोजणी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.
हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला मंगळवार, दि. ४ जून रोजी सकाळी ८ वाजता सुरुवात होणार असून, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया लिंबाळा मक्ता येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात होणार आहे.
९२- वसमत, ९३-कळमनुरी आणि ९४ - हिंगोली विधानसभा मतदारसंघाच्या विशेष मतमोजणी निरीक्षक म्हणून श्रीमती एम. एस. अर्चना या काम पाहणार असून, ८२- उमरखेड, ८३- किनवट आणि ८४ हदगाव विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी एम. पी. मारोती यांच्या निरीक्षणाखाली होणार आहे. श्रीमती अर्चना यांच्या संपर्क अधिकारी म्हणून विभागीय वन अधिकारी श्रीमती पुष्पा पवार (७५८९२१०३०६) व ए.सी.एफ. वन अधिकारी सुनील शिंदे (९४०५६१९८२८) हे या कालावधीत त्यांच्यासोबत राहणार आहेत. तर मतमोजणी निरीक्षक एम. पी. मारोती यांचे संपर्क अधिकारी म्हणून उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी शशीकिरण उबाळे (९७६३७२६९९५) हे त्यांच्यासोबत असतील, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली आहे.
१५-हिंगोली लोकसभा मतदार संघासाठी २६ एप्रिल रोजी म्हणजेच दुस-या टप्प्यात मतदान पार पडले होते.
*****
Subscribe to:
Posts (Atom)



