03 June, 2024
बाळाच्या लसीकरण नोंदणीसाठी युविन पोर्टल नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 03 : भारत सरकारने संपूर्ण देशभरात नियमित लसीकरणासाठी युविन पोर्टलची निर्मिती केलेली आहे. नियमित लसीकरण हे युविन पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन राबविण्यात येत आहे.
बाळाचे लसीकरण नोंदणी https/uwinselfregistration mohfw.gov.in/login या लिंकचा वापर करून घरी बसून करता येईल. यासाठी आपणास गुगलवरील उपरोक्त दिलेल्या लिंकवर बालकांच्या लसीकरणाची नोंदणी करावी. तसेच घराजवळ असलेल्या जवळच्या लसीकरण सत्राची निवड करावी. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपण निवड केलेल्या लसीकरण स्थळी जाऊन बालकांचे लसीकरण पूर्ण करून घ्यावे.
या लसीकरणांमध्ये बीसीजी, पोलिओ, आयपीव्ही, पीसीव्ही, पेंटा, एमआर आणि विटामिन ए व बूस्टर डोस देण्यात येत आहे. जेणेकरून पोलिओ, क्षयरोग, डांग्या खोकला, घटसर्प, धनुर्वात, गोवर रूबेला, अतिसार आणि मेंदूज्वर या आजारापासून बाळ सुरक्षित राहील आणि भावी पिढी सुदृढ व निरोगी बनेल. युविन प्री रजिस्ट्रेशनचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगूलवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सुनील देशमुख यांनी केले आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment