07 June, 2024

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 07 : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती महत्वाकांक्षी कार्यक्रम ही योजना राज्य शासनाच्या उद्योग विभागामार्फत नवीन उद्योग उभारणीसाठी व मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीसाठी ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतून हिंगोली जिल्ह्यासाठी सन 2024-25 साठी 600 कर्ज प्रकरणाचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना जिल्हास्तरीय कार्यबल समितीमार्फत पात्र अर्ज विविध बँकेकडे पाठविण्याकरिता शिफारस केली जातात. या योजनेंतर्गत उत्पादन उद्योगासाठी 50 लाख व सेवा उद्योगासाठी 20 लाखापर्यंत कर्ज मर्यादा आहे.यासाठी 15 ते 25 टक्के पर्यंत अनुदान देय आहे. ही संपूर्ण प्रक्रिया जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र यांच्यामार्फत समन्वयीत केली जाते. या योजनमेध्ये ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी इच्छूक उमेदवारांनी www.maha-cmegp.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा. ही योजना नवीन उपक्रम सुरु करण्यासाठी बँकामार्फत दिल्या जाणाऱ्या कर्जास संलग्न अनुदान योजना आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र, हिंगोली येथे संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक शोएब कादरी यांनी केली आहे. *******

No comments: