28 June, 2024
अतिवृष्टीच्या प्रलंबित अनुदान वाटपाचा निपटारा करण्यासाठी गावपातळीवर विशेष कॅम्पचे आयोजन
हिंगोली (जिमाका), दि. २८ : माहे नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या अनुदान वाटपा संदर्भात प्रलंबित कामकाजाचा निपटारा करण्यासाठी दि. 29 जून व दि. 30 जून 2024 रोजी हिंगोली तालुक्यात गाव पातळीवर विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या अनुदान वाटप संदर्भात ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आपले कागदपत्र आपल्या गावाची याबाबतची जबाबदारी सोपविलेल्या कृषी सहायक ग्रामसेवक किंवा तलाठी यांना सुपूर्द करणे बाकी राहिले असेल किंवा व्ही के (V.K.) नंबर प्राप्त झाला नसल्यामुळे इ केवायसी करणे बाकी असेल किंवा फेल्ड डाटा मुळे ई- के.वाय.सी (E-K.Y.C.)होत नसेल अशा सर्व शेतकऱ्यांनी दिनांक 29 व 30 जून रोजी आपल्या गावात उपस्थित राहून संबंधित कर्मचारी यांच्या सहकार्याने प्रलंबित बाबीची पूर्तता करावी. जेणेकरून त्यांच्या खात्यावर माहे नोव्हेंबर 2023 च्या अतिवृष्टीचे अनुदान जमा करणे सुलभ होईल, असे आवाहन तहसीलदार नवनाथ वगवाड यांनी केले आहे.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment