13 June, 2024
दिव्यांगाना प्राधान्याने शासकीय योजनांचा लाभ द्यावा - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
हिंगोली (जिमाका), दि. 13 : या बैठकीत दिव्यांगांचे जीवन सुलभ व आनंदी होण्यासाठी दिव्यांगांना सर्व शासकीय योजनांचा लाभ प्राधान्याने द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आयोजित बैठकीत सर्व संबंधित यंत्रणेला दिले.
दिव्यांगांच्या विविध मागण्या संदर्भात दिनांक 12 जून 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व शासकीय विभागांची बैठक जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे डॉ. मंगेश टेहरे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त यादव गायकवाड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, दिव्यांग बांधव उपस्थित होते.
दिव्यांगांना आवश्यक असणारी विविध प्रमाणपत्रे उपलब्ध करून द्यावेत. तसेच शासकीय योजनेत मोठ्या प्रमाणात सहभाग करून घ्यावा. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व नगरपालिका यांनी त्यांच्या स्व-उत्पन्नातून पाच टक्के दिव्यांग कल्याण निधी राखून ठेवावा व तो नियमानुसार दिव्यांगासाठी खर्च करावा. याबाबत जे अधिकारी कार्यवाही करणार नाहीत त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी दिल्या.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment