24 June, 2024
जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या त्रैमासिक कामकाजाचा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडून आढावा
हिंगोली (जिमाका), दि.24 : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, 2015 च्या कलम 106 नुसार जिल्हा बाल संरक्षण कक्षाची जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच आढावा घेण्यात आला.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, गणेश वाघ, जिल्हा समाज कल्याण अधिकारी आर. एच. एडके, नगर परिषदेचे उप मुख्याधिकारी उमेश हेबाडे, सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाचे आ. ना. वागतकर, जिल्हा सरकारी कामगार अधिकारी टी. ई. कराड, उपशिक्षणाधिकारी नितीन नेटके, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश जाधव, महेश राऊत, पोलीस अधीक्षक यांचे प्रतिनिधी एस. पी. डोंगरे, जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रतिनिधी डॉ. बालाजी भाकरे, बाल न्याय मंडळ यांचे प्रतिनिधी अशोक खुपसे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक विलास जगताप, नेहरु युवा केंद्राचे समन्वयक आशिष पंत, एनएसएस जिल्हा समन्वयक डॉ. सचिन हाटकर, युनिसेफ SBC३ चे वरिष्ठ प्रकल्प समन्वयक विकास कांबळे, प्रकल्प समन्वयक मोनाली धुर्वे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर. आर. मगर, बाल कल्याण समिती अध्यक्ष सुधाकर इंगोले, बाल कल्याण समिती सदस्य परसराम हेबाडे, चंद्रकांत पाईकराव, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) पठाण, कायदा व परीविक्षा अधिकारी अँड. अनुराधा पंडित, समुपदेशक सचिन पठाडे, बाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) गणेश मोरे, जरीब खान, सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे, रेश्मा पठाण, अनिरुध्द घनसावंत, चाईल्ड लाईन केंद्राचे समन्वयक संदिप कोल्हे उपस्थित होते.
या बैठकीमध्ये कक्षाने राबविलेले विविध जन जागृती कार्यक्रम, जिल्हा महिला व बाल विकास विभाग व मिरंकल फाऊंडेशन यांच्या समन्वयाने बालगृहातील बालकांसाठी समर कॅम्पचे आयोजन, वैयक्तिक स्वच्छतेचे सत्र, मनोरंजनात्मक खेळ, कोविड काळात एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या गृहभेटी, मिशन वात्सल्य पोर्टल, NCPCR पोर्टल, घर पोर्टल, PM Care पोर्टल, गती शक्ती पोर्टल व Caring पॉर्टल या सर्व पोर्टलवर भरण्यात येणाऱ्या माहितीबाबत, कोविड-19 मध्ये एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या नव्याने 1 बालक आढळून आल्याबाबत, प्रतिपालकत्व आणि प्रायोजकत्व या योजनेबाबत तसेच जिल्ह्यातील बालविवाह समूळ नष्ट करण्यासंदर्भात आखलेल्या नवीन योजनांची माहिती, बाल संगोपन योजनेसाठी आलेल्या लाभार्थ्यांचे करण्यात आलेले सामाजिक तपासणी अहवाल, बाल कामगार शोध मोहिम धाडसत्र, सीआयएसएस बालकांची शोध मोहीम आदी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तथा सदस्य सचिव आर. आर. मगर यांनी दिली.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment