24 June, 2024
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांनी तातडीने कागदपत्रे सादर करावीत
हिंगोली (जिमाका), दि.24 : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील शासकीय वसतिगृहांसाठी पात्र परंतु, वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या, प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी भोजन, निवास, शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजता राबविण्यात येत आहे.
त्यानुसार सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात स्वाधार योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची मंजूर रक्कम ही आभासी वैयक्तीक ठेव लेखा (VPDA) पोर्टलमार्फत थेट लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर जमा होणार आहे.
हिंगोली नगरपालिका हद्दीपासून 5 कि.मी. च्या परिसरातील महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या स्वाधार योजनेसाठी अर्ज भरलेल्या पात्र लाभार्थ्यांनी राष्ट्रीयकृत बँक खात्याची छायांकित रंगीत प्रत, पॅन कार्ड, आधार कार्डची छायांकीत प्रत, बँकेचा रद्द केलेला (Cancelled) चेक इत्यादी कागदपत्रे तातडीने सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या पाठीमागे, दर्गा रोड, हिंगोली येथे सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment