29 June, 2024
हृदयविकार रुग्णांकरिता 2डी इको तपासणी शिबीर
हिंगोली, (जिमाका) दि.29 : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या वैद्यकीय पथकाकडून 18 वर्षापर्यंतच्या हृदयविकार रुग्णांकरिता नुकतेच जिल्हा रुग्णालयात 2डी इको तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी डॉ. भूषण चव्हाण (कार्डियालॉजिस्ट), डॉ. प्रतीक मिश्रा यांच्यामार्फत तपासणी करण्यात आली. या 2डी इको तपासणी शिबिरास डॉ. नितीन तडस, जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. दीपक मोरे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ .शैलजा कुप्पास्वामी, निवासी वैद्यकीय अधिकारी, डॉ. गोपाळ कदम, बालरोगतज्ज्ञ, डॉ. मंगेश टेहरे अस्थिव्यंगतज्ज्ञ, डॉ. स्नेहल नगरे, बालरोगतज्ज्ञ, डॉ.बालाजी भाकरे, वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आले.
शिबिराच्या यशस्वीतेकरिता श्री. चिंचकर, श्रीमती आशा क्षीरसागर, श्रीमती शिंदे , श्रीमती कदम, परिसेविका, डॉ. संतोष नांदुरकर, जिल्हा उद्योग केंद्राचे लक्ष्मण गाभणे, जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक, ज्ञानोबा चव्हाण व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता, एएनएम व कार्यालयीन कर्मचारी व रुग्णालयीन अधिपरिचारिका इत्यादींनी परिश्रम घेतले.
या शिबिराकरिता हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव या तालुक्यातील 115 संशयित ह्रदय रुग्ण विद्यार्थ्यांची 2डी इको तपासणी करण्यात आली. यापैकी शस्त्रक्रियाकरिता 20 विद्यार्थीसंदर्भित करण्यात आले आहेत. या शस्त्रक्रियाकरिता संदर्भित विद्यार्थ्यांच्या शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत व आरबीएसके कार्यक्रमअंतर्गत मोफत बालाजी हॉस्पिटल, मुंबई यांच्याकडून करण्यात येणार आहेत. हिंगोली जिल्ह्यातील गरजू रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. या कार्यक्रमांतर्गत शस्त्रक्रिया पूर्ण झालेल्या व योग्य उपचार मिळालेल्या पालकांनी आरबीएसके कार्यक्रमांतर्गत वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.
तसेच हिंगोली जिल्ह्यातील विद्यार्थी व बालकांना या आरबीएसके कार्यक्रमामार्फत आवाहन करण्यात येते की, दैनंदिन जीवनात वावरताना हृदयाच्या आजारासंदर्भात वेळोवेळी 2डी इको तपासणी करावी व वेळेत आजाराचे निदान करून घ्यावे, असे आवाहन डॉ. नितीन तडस यांनी केले आहे.
00000000
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment