07 June, 2024

जिल्हा परिषदेच्या रिक्त पदांची 10 जूनपासून अमरावती, नागपूर येथे ऑनलाईन परीक्षा

• सर्व संबंधित उमेदवारांनी संकेतस्थळावर जाऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेण्याचे आवाहन हिंगोली (जिमाका), दि. 07 : येथील जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गामधील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी 10 जूनपासून तीन दिवस अमरावती व नागपूर येथे ऑनलाईन परीक्षा आयोजित करण्यात आली असून, उमेदवारांनी प्रवेश पत्र डाऊनलोड करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष जितेंद्र पापळकर व मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांनी केले आहे. या पदाची जाहिरात क्र. 01/2023, दि. 5 ऑगस्ट, 2023 अन्वये प्रसिध्द करण्यात आली होती. या जाहिरातीमध्ये दर्शविलेल्या आरोग्य सेवक पुरुष ४० टक्के रिक्त पद भरतीसाठी ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे. या ऑनलाईन परीक्षा दि. 10, 11 व 12 जून, 2024 रोजी अमरावती व नागपूर येथील पुढील केंद्रावर होणार आहेत. ऑयन डिजिटल झोन, आयडीझेड सीटीलँड एम.एस. विनसर इन्फोटेक लेन-सी, सिंध होजिअरीच्या बाजूला, सिटीलँड ट्रेडींग हब ऑफ एनएच-6, बोरगाव धरमाले जवळ, अमरावती-444901 येथील दोन परीक्षा केंद्रावर व ऑयन डिजिटल झोन, आयडीझेड-2, वाडी एमआयडीसी, बालाजी इन्फोटेक प्लॉट नं. डी 7/2 हिंगणा एमआयडीसीजुने बजाज प्लास्टीक लेन समोर, बीएमडब्ल्यू शोरुम वाडी हिंगणा रोड, नागपूर-440028 येथील दोन परीक्षा केंद्रावर तसेच ऑयन डिजिटल झोन, आयडीझेड-3, वाडी टेकग्रेसर सॉफ्ट सोल्यूशन प्रा.लि. जी.4/1/बी, एमआयडीसी, हिंगण वाडी रोड, मनीष मोटर्स समोर, बीएमडब्ल्यू शोरुम नागपूर-440028 येथील एका अशा पाच केंद्रावर होणार आहे. वरील पदाची ऑनलाईन परीक्षा ही हिंगोली जिल्ह्यामध्ये घेण्यात येणार नसून इतर जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे, याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी. वरील पदाच्या ऑनलाईन परीक्षेकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांना प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी ऑनलाईन लिंक जिल्हा परिषद हिंगोलीच्या www.zphingoli.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. उमेदवारांना या लिंकद्वारे प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेता येतील. तसेच उमेदवारांच्या माहितीसाठी मराठी व इंग्रजी भाषेतील माहिती पुस्तिका www.zphingoli.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. उमेदवारांनी या संकेतस्थळावर जाऊन आपले प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घ्यावेत. तसेच ऑनलाईन परीक्षेकरिता उमेदवारांनी त्यांच्या परीक्षेच्या रिपोर्टींग वेळेच्या अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. उमेदवारांनी त्यांच्या प्रवेशपत्रामध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. जाहिरातीतील नमूद केलेल्या उर्वरित इतर पदाच्या ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक नंतर कळविण्यात येईल. उपरोक्त सर्व नमूद बाबींची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष जितेंद्र पापळकर व जिल्हा परिषद हिंगोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांनी केले आहे. ******

No comments: