19 June, 2024
हिंगोली लोकसभा मतदार संघातील उमेदवारांनी निवडणुकीचे अंतिम लेखे सादर करावेत
हिंगोली (जिमाका), दि. 19 : लोकप्रतिनिधीत्व अधिनियम-1951 चे कलम 78 नुसार निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवारांने त्यांचे निवडणूक कालावधीमध्ये केलेल्या सर्व खर्चाचे लोकप्रतिनिधीत्व अधिनियमातील कलम 77 नुसार अचूक व परिपूर्ण लेखे निवडणूक निकाल जाहीर झाल्यापासून 30 दिवसाच्या आत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करणे बंधनकारक आहे. त्यामुळे हिंगोली लोकसभा निवडणूक लढविलेल्या सर्व उमेदवारांनी अचूक व परिपूर्ण लेखे तात्काळ सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.
अचूक व परिपूर्ण लेखे सादर न करणाऱ्या उमेदवारांना भारत निवडणूक आयोग यांच्याकडून नोटीस बजावून लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 कलम 10 (अ) नुसार संसदेच्या दोन्ही सभागृहाचे तसेच राज्य विधिमंडळाच्या सभागृहाचे सदस्य म्हणून निवडणूक लढविण्यास 3 वर्षासाठी अपात्र केले जाऊ शकते. त्यामुळे निवडणूक लढविलेल्या सर्व उमेदवारांनी निवडणूक खर्चाचे अंतिम लेखे व आवश्यक कागदपत्रे विहित कालावधीमध्ये सादर करावीत, असे निर्देश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पत्राद्वारे दिले आहेत.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment