19 June, 2024
मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी पात्र ज्येष्ठ नागरिकांकडून 25 जुलैपर्यंत अर्ज आमंत्रित
हिंगोली (जिमाका), दि. 19 : राज्यातील 65 व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी तसेच आवश्यक गरजांसाठी राज्य शासनाने 'मुख्यमंत्री वयोश्री योजना' सुरु केली आहे. यासाठी पात्र ज्येष्ठ नागरिकांना 3 हजार रुपये पर्यंतची रक्कम साहित्य खरेदीसाठी महाडिबीटीद्वारे त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी दिनांक 25 जुलैपर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली येथे अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.
अर्जदार हा 31 डिसेंबर 2023 अखेरपर्यंत वयाची 65 वर्षे पूर्ण केलेला असावा. अर्जासोबत आधार कार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी, राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य, केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्ती वेतन मिळाल्याचा पुरावा किंवा तहसीलदार किंवा तत्सम सक्षम अधिकारी यांनी निर्गमित केलेले ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र जोडणे आवश्यक, आधार संलग्न राष्ट्रीयकृत बँकेतील बचत बँक खात्याचे पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे २ छायाचित्रे, उत्पन्नाचे प्रमाणपत्र. (लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयंच्या आत असावे.), स्वयं-घोषणापत्र - CPSU द्वारे लाभार्थ्यांकडून सदरील प्राप्त रक्कम नेमून दिलेल्या प्रयोजनाकरिता वापरण्यात येईल, असे स्वयंघोषणापत्र प्राप्त करुन घ्यावे तसेच राष्ट्रीय योजनेचा, केंद्र पुरस्कृत समकक्ष योजनेचा मागील 3 वर्षात लाभ घेतला नसल्याचे देखील स्वयंघोषणापत्र नमूद करण्यात यावे. तसेच वरीलपैकी कोणते साहित्य खरेदी करणार याची माहिती अर्जात नमूद करणे आवश्यक आहे.
वरील कागदपत्रे पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांनी 25 जुलैपर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पूर्व बाजूस, दर्गा रोड, हिंगोली येथे परिपूर्ण अर्ज सादर करावेत.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment