04 June, 2024

हिंगोली लोकसभा मतदारसंघातून आष्टीकर पाटील नागेश बापूराव विजयी घोषित • नोटाला 3 हजार 123 मतदारांची पसंती

हिंगोली (जिमाका), दि.04 : 15- हिंगोली लोकसभा मतदार संघातून आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उमेदवार आष्टीकर पाटील नागेश बापूराव हे 1 लाख 8 हजार 602 मतांनी विजयी झाल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी घोषित करत त्यांना विजयाचे प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळी विशेष मतमोजणी निरीक्षक श्रीमती एम. एस. अर्चना, एम. पी. मारोती, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे यांच्यासह निवडणूक यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते. विजयी उमेदवार श्री. आष्टीकर यांनी 26 व्या फेरीअखेरीस टपाली मतदानासह त्यांना 4 लाख 92 हजार 535 मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार दुस-या क्रमांकावर बाबुराव कदम कोहळीकर यांना 3 लाख 83 हजार 933 मते मिळाली. तर तिस-या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. बी. डी. चव्हाण यांना 1 लाख 61 हजार 814 मते मिळाली. गजानन धोंडबा डाळ (बहुजन समाज पार्टी) यांना 7,465, विजय रामजी गाभणे (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्ससिस्ट) यांना 14,644, अनिल देवराव मोहिते (अखिल भारतीय परिवार पार्टी) यांना 3,374, ॲड. अलताफ अहेमद (इंडियन नॅशनल लीग) यांना 2,950, देवसरकर वर्षा शिवाजीराव (बहुजन मुक्ती पार्टी) यांना 4,099, देशा श्याम बंजारा (समनक जनता पार्टी) यांना 2,063, प्रकाश मेशराम रणवीर (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया-ए) यांना 2,102, रवी रामदास जाधव-सवनेकर (अभिनव भारत जनसेवा पक्ष) यांना 1,602, सुनिल दशरथ इंगोले (भीमसेना) यांना 1,027, हेमंत राधाकिशन कनाके (राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी) यांना 1,800, त्रिशला मिलिंद कांबळे (बहुजन समाज पार्टी-आंबेडकर) यांना 2,150, अशोक पांडुरंग राठोड (अपक्ष) यांना 2,906, आनंद राजाराम धुळे (अपक्ष) यांना 9,817, अंबादास सुकाजी गाडे (अपक्ष) यांना 14,742, अ. कदिर मस्तान सय्यद (गोरेगावकर) (अपक्ष) यांना 3,713, दत्ता श्रीकृष्ण सूर्यवंशी (अपक्ष) यांना 7,239, देवजी गंगाराम आसोले (अपक्ष) यांना 1,483, बाबुराव आनंदराव कदम (अपक्ष) यांना 4,482, भवर गोविंदराव फुलाजी (अपक्ष) यांना 2,146, महेश कैलास नप्ते (अपक्ष) यांना 2,299, ॲड. रवि शिंदे (अपक्ष) यांना 2,701, रामप्रसाद नारायण बांगर (अपक्ष) यांना 4,525, ॲड. रामराव आत्माराम जुंबडे (अपक्ष) यांना 2,103, वसंत किसन पाईकराव (अपक्ष) यांना 593, विजय ज्ञानबा राऊत (अपक्ष) यांना 1,126, विश्वनाथ भाऊराव फाळेगावकर (अपक्ष) यांना 1,859, ॲड. शिवाजीराव जाधव (अपक्ष) यांना 2,214, सत्तार पठाण (अपक्ष) यांना 2,463, सर्जेराव निवृत्ती खंदारे (अपक्ष) यांना 5,014आणि सुनिल मोतीराम गजभार (अपक्ष) यांना 3,192 तर नोटाला 26 व्या फेरीअखेरीस टपाली मतदानासह 3,123 मतदारांनी पसंती दर्शविली असून 11 लाख 59 हजार 298 मते वैध ठरली आहेत. अवैध मते 446 आणि 15 टेंडर मते पडली असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी घोषित केले आहे. या निवडणूक प्रक्रियेत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीमती मेघना कावली, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, सहायक निवडणूक अधिकारी क्रांति डोंबे, डॉ. सखाराम मुळे, डॉ. सचिन खल्लाळ, अविनाश कांबळे, उपजिल्हाधिकारी समाधान घुटुकडे, उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांच्यासह सर्व पथकप्रमुख सहभागी झाले होते. 15- हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात म्हणजे 26 एप्रिल 2024 रोजी मतदान पार पडले होते. ******

No comments: