21 June, 2024
यंत्रणांनी पुढाकार घेत ‘बाल विवाहमुक्त हिंगोली'कडे वाटचाल करावी - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
हिंगोली (जिमाका), दि. 21 : जिल्ह्यातील प्रत्येक गावात ग्राम बाल संरक्षण समिती सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रत्येक विभागाने पुढाकार घेऊन बालविवाह निर्मूलनासाठी आपल्या जबाबदाऱ्या ओळखून बाल विवाहमुक्त हिंगोलीकडे वाटचाल करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले. नुकतीच जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली बालविवाह निर्मूलन जिल्हा कृती दलाची आढावा बैठक पार पडली.
या बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अनंत कुंभार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) गणेश वाघ, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक नितीन नेटके, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके, उपमुख्याधिकारी नगर परिषद उमेश हेंबाडे, जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक सचिन हटकर, जिल्हा कौशल्य विकास प्रतिनिधी महेश राऊत, पोलीस निरीक्षक एस. पी. डोंगरे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त आ. ना. वागतकर, सरकारी कामगार अधिकारी टी. ई. कराड, डॉ. प्रकाश जाधव, सहायक माहिती अधिकारी चंद्रकांत कारभारी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर. आर. मगर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, एसबीसी-3 आणि 'यूनिसेफ'चे वरिष्ठ प्रकल्प समन्वयक विकास कांबळे उपस्थित होते.
जिल्ह्यातील निवडक 125 शाळांमध्ये वर्ग 6 ते 10 वीच्या विद्यार्थी व पालकांचे बालविवाह निर्मूलन जनजागृती सत्र महिला व बालविकास विभागाच्या सहकार्याने व युनिसेफ आणि एसबीसी 3 यांच्या आर्थिक सहकार्याने उज्वल शिक्षण प्रसारक मंडळ हिंगोली संस्थेने नियुक्त केलेल्या 40 स्वयंसेविकांच्या माध्यमातून 1 जुलैपासून घेण्यात येणार आहे. हे सत्र जिल्ह्यातील इतर शाळेत सुद्धा शिक्षण विभागाने घ्यावे. प्रत्येक शाळेत दर सोमवारी बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा द्यावी. राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांना बालविवाह जनजागृतीसाठी प्रशिक्षण देवून राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांकडून ग्रामीण भागात तसेच जिल्हास्तरावर मोठ्या प्रमाणात लोकसंख्येत सक्षम युवा शक्ती कार्यक्रमाचे आयोजन करावे, असेही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.
प्रकल्प समन्वयक मोनाली धुर्वे, बाल कल्याण समिती अध्यक्ष सुधाकर इंगोले, बाल कल्याण समिती सदस्य परसराम हेंबाडे, जिल्हा शल्य चिकित्सक प्रतिनिधी बालाजी भाकरे, प्रकल्प समन्वयक, चाईल्ड लाईन 1098 संदीप कोल्हे, बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) गणेश मोरे, बाल संरक्षण अधिकारी जरिबखान पठाण, कायदा तथा परीविक्षा अधिकारी अनुराधा पंडित, समुपदेशक सचिन पठाडे, सामाजिक कार्यकर्ता रेशमा पठाण, रामप्रसाद मुडे, अनिरुद्ध घनसावंत, तथागत इंगळे, राजरत्न पाईकराव इत्यादी उपस्थित होते.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment