24 June, 2024
निवडणूक खर्चाची अंतिम लेखे अचूक सादर करण्यासाठी जिल्हास्तरीय खर्च नियंत्रण समितीच्या पथक प्रमुखाकडून सादरीकरण
हिंगोली (जिमाका), दि. 24 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा निवडणुकीचे अंतिम लेखे अचूक सादर करण्यासाठी जिल्हास्तरीय खर्च नियंत्रण समितीचे प्रथक प्रमुख माधव झुंजारे यांनी सादरीकरणाद्वारे सर्व पथक प्रमुख, उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधीना माहिती दिली.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे अंतिम लेखे अचूक सादर करण्यासाठी जिल्हास्तरीय खर्च नियंत्रण समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हास्तरीय खर्च नियंत्रण समितीचे पथक प्रमुख माधव झुंजारे, दिगंबर माडे, निवडणूक खर्च निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी गणेश वाघ आदी उपस्थित होते.
राजकीय पक्षाचे सनियंत्रण करण्यासाठी विविध समिती व भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये व्हिडिओ सनियंत्रण समिती (व्हीएसटी), व्हिडीओ पाहणारा चमू (व्हीव्हीटी), स्थिर संनियंत्रण चमू (एसएसटी), लेखांकन करणारा चमू, भरारी पथक, माध्यम प्रमाणीकरण आणि संनियत्रण समितीच्या पथक प्रमुखांनी खर्चाच्या नोंदी अचूक सादर कराव्यात. उमेदवाराने घेतलेल्या खर्चाचा ताळमेळ नोंदी व पथकप्रमुखाच्या नोंदी अचूक असल्याची बाब जाणीवपूर्वक तपासून घ्यावी. लोकसभा मतदार संघ व विधानसभा मतदार संघनिहाय सहायक निवडणूक खर्च निरीक्षकांनी दैनंदिन नोंदी अभिरुप ताळमेळ नोंदवहीत अचूकपणे नोंदवून अंतिम लेखे सादर करावेत. तसेच निवडणूक आयोगाने दिलेल्या विहित नमुन्यात सर्व उमेदवारांनी निवडणुकीचे अंतिम खर्च लेखे अद्ययावत तात्काळ सादर करावेत, अशा सूचना पथक प्रमुख माधव झुंजारे व दिगंबर माडे यांनी यावेळी उपस्थितांना दिल्या.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment