25 June, 2024
अनुसया विद्या मंदिर येथे बाल कायद्यांची जनजागृती
हिंगोली (जिमाका), दि. 25 : येथील खटकाळी परिसरातील अनुसया विद्या मंदिरामध्ये जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयामार्फत बाल कायद्यांची जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी चाईलड हेल्पलाईनचे प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे यांनी बालकामगार विरोधी दिन व मोबाईलचे दुष्परिणाम उदाहरणाद्वारे शाळेतील विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी बालकाचे हक्क, चांगला -वाईट स्पर्श, त्याचबरोबर बालविवाह कायदा 2006 नुसार बालविवाह होण्याची कारणे व दुष्परिणाम, जिल्ह्यात बालकांसाठी कार्यरत असणाऱ्या यंत्रणा तसेच संकटकाळी बालकांना मदतीची गरज असल्यास कशा प्रकारे मदत करता येईल, याबाबत तसेच बालकांना चाईल्ड हेल्पलाईन 1098 विषयी माहिती दिली.
याप्रसंगी चाईल्ड हेल्पलाईनचे केस वर्कर सूरज इंगळे, अनुसया विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका श्रीमती फडणीस, शिक्षक श्री. राठोड, श्री. वानखेडे, श्री. मोघरगे, श्रीमती जगताप, श्रीमती मुळे तसेच बालक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment