17 April, 2025
मार्च अखेरचे ईआर-1 त्रैमासिक विवरणपत्र 30 एप्रिलपर्यंत सादर करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 17 : सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच खाजगी आस्थापनांनी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांच्याकडे आपल्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची माहितीबाबतचे माहे मार्च,2025 अखेरचे ईआर-1 त्रैमासिक विवरणपत्र www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर दि. 30 एप्रिल,2025 पर्यंत ऑनलाईन भरावेत. माहे एप्रिल-2025 ची मासिक वेतन देयके दाखल करताना ईआर-1 भरुन दिल्याचे ऑनलाईन प्रमाणपत्र देयकासोबत जोडणे आवश्यक आहे. याशिवाय एप्रिल, 2025 ची वेतन देयके स्वीकारले जाणार नाहीत याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
तसेच सर्व कार्यालयांना जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,हिंगोली या कार्यालयामार्फत युजर आयडी व पासवर्ड यापूर्वीच कळविण्यात आलेले आहेत. त्यानुसार सर्व कार्यालयानी आपला ई-मेल पत्ता, दूरध्वनी क्रमांक, पत्ता, टॅन क्रमांक, पॅन क्रमांक टाकून आपली प्रोफाईल अद्यावत करावी, असे आवाहन सहायक आयुक्त , कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, हिंगोली यांनी केले आहे.
***
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment