23 April, 2025
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे डिग्रस कऱ्हाळे येथे आयुष्मान व किसान कार्ड शिबिरात मार्गदर्शन
हिंगोली (जिमाका), दि. 23 : हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आज आयुष्यमान कार्ड व किसान कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते आयुष्यमान कार्ड व किसान कार्ड काढणाऱ्या शेतकऱ्यांना कार्ड वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी उपस्थित ग्रामस्थांना कृषी, आरोग्य शिक्षण या संदर्भात अडीअडचणी विचारून घेतल्या व शेतकऱ्यांच्या हिताच्या योजनाबाबत त्यांना तसेच बचत गटाच्या महिलांना शासनाच्या योजनाची माहिती दिली. तसेच त्यांनी डिग्रस कऱ्हाळे येथील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला शासकीय गायरानातील जमीन हस्तांतरित करण्यात येईल, असे सांगितले.
यावेळी ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, गटविकास अधिकारी गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास संभाजी कऱ्हाळे, ग्रामविकास अधिकारी श्री. हेलगड, मंडळ अधिकारी, तलाठी, गजानन रणखांब, डॉ.संगीता टारफे, बळीराम पाटील, शिवाजी कऱ्हाळे, रावसाहेब कऱ्हाळे, बळीराम पाटील, अशोक काळे, शैलेश कऱ्हाळे, शिवम कऱ्हाळे, छाया कऱ्हाळे, अंगणवाडी ताई व आशा वर्कर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
***
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment