हिंगोली (जिमाका), दि. 24 : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या अंमलबजावणीस दि. 28 एप्रिल, 2025 रोजी दहा वर्षे पूर्ण होत आहेत. या दशकपूर्तीचे औचित्य साधून जिल्हास्तरावर तसेच ग्रामपातळीवर ग्रामपंचायत स्तरावर विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे.
त्याअनुषंगाने सर्व कार्यालय प्रमुखांनी दि. 28 एप्रिल, 2025 रोजी जनसहभागासह विविध उपक्रम राबवून लोकसेवा हक्क दिन साजरा करावा. नागरिकामध्ये अधिनियमाची तसेच ऑनलाईन उपलब्ध सेवाबाबतची जनजागृती करावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी केले आहे.
******
No comments:
Post a Comment