11 April, 2025
अवैध गौण खनिज वाहतूक मालकांनी दंडाची रक्कम सात दिवसात भरावी
• दंड न भरल्यास वाहन लिलाव करुन रक्कम शासन जमा करणार-तहसीलदार
हिंगोली (जिमाका), दि. 11 : वसमत येथील तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जे वाहने अवैध गौण खनिज वाहतूक करीत असतांना अवैध गौण खनिज प्रतिबंधात्मक पथकाकडून दंडात्मक कारवाई झालेली आहे. संबंधित वाहन मालकांने अद्याप दंडाची रक्कम भरणा केलेली नाही. वाहनाची दंडाची रक्कम 7 दिवसाच्या आत भरणा करावी अन्यथा उपरोक्त वाहनांचा लिलाव करुन लिलावाअंती प्राप्त रकमेतून वाहनाची दंडाची रक्कम शासन खाती भरणा करण्यात येईल, असे आवाहन तहसीलदार शारदा दळवी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment