30 April, 2025
दिशा समितीवर सदस्यांची नियुक्ती
हिंगोली (जिमाका), दि. 30 : हिंगोली जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा) समितीवर लोकसभा सदस्य तथा दिशा समितीचे अध्यक्ष खासदार नागेश बापूराव पाटील-आष्टीकर यांनी शिफारस केलेल्या विविध क्षेत्रातील नऊ सदस्यांची नियुक्ती जिल्हाधिकारी तथा दिशा समितीचे सदस्य सचिव राहुल गुप्ता यांनी नुकतीच केली आहे.
या समितीमध्ये सरपंच प्रतिनिधी म्हणून कळमनुरी तालुक्यातील माळेगावचे सरपंच संदीप उत्तमराव ससे, कवडीचे सरपंच दयानंद मुकुंदराव पतंगे, सेनगाव तालुकयातील कहाकर जिरे येथील सरपंच श्रीमती शारदा संतोष पोपळघट, हिंगोली तालुक्यातील जामठी (खु.) च्या सरपंच श्रीमती शशीकला माधवराव भवर, औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजारचे सरपंच अविनाश सीताराम मुळे यांची नियुक्ती केली आहे. तर बिगर सरकारी संस्था प्रवर्गातून औंढा नागनाथ तालुक्यातील शिरलाचे सुंदरराव मुंजाजी कुर्हे पाटील ऊर्फ बाळू पाटील, अनुसूचित जातीचे प्रतिनिधी म्हणून औंढा नागनाथ तालुक्यातील बेरुळाचे भास्कर हिरामण घोडके यांची, अनुसूचित जमातीचे प्रतिनिधी म्हणून कळमनुरी तालुक्यातील ढोलक्याची वाडी येथील डॉ. सतीष यशवंतराव पाचपुते यांची तर महिलांच्या प्रतिनिधी म्हणून वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील श्रीमती आश्विनी शिवाजीराव इंगोले पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती ग्रामीण विकास मंत्रालय, ग्रामीण विकास विभाग, कृषी भवन, भारत सरकार, नवी दिल्ली यांनी जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीबाबतच्या निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक तरतुदी, सूचना, अटी व शर्तीच्या अधीन राहून लोकसभा मतदार संघ हिंगोली तथा अध्यक्ष दिशा समिती यांच्या शिफारसीनुसार वरील सदस्यांची नियुक्ती पुढील आदेशापर्यंत करण्यात आली आहे.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment