जिल्हयात कलम 37 (1) (3) चे आदेश
लागू
हिंगोली, दि. 30 : जिल्हयात
मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) चे आदेश दिनांक 31 जानेवारी, 2017 रोजीचे
06.00 वाजेपासुन ते दि. 14 फेब्रुवारी, 2017 रोजीच्या रात्रीच्या 12 वाजेपर्यंत लागू
करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी अनिल माचेवाड यांनी कळविले आहे.
दि.
31 जानेवारी, 2017 रोजी सकल मराठा समाजातर्फे राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात
येणार आहे. तसेच दि. 14 फेब्रुवारी, 2017 रोजी व्हलेंटाईस डे असल्याने या दिवशी हिंदुत्वावादी
संघटना व कट्टर मुस्लीम संघटना निषेध व निदर्शने करतात. सध्या मराठा, मुस्लीम व धनगर
समाजाची आरक्षणाची मागणी व त्याकरिता करण्यात येणारे आंदोलनात्मक कार्यक्रम, मराठा
संघटनांतील आपआपसातील वाद, संकेतस्थळाच्या माध्यमातून होत असलेली देवीदेवतांची थोरपुरूषांची
विटंबना, जातीय घटनांचा वाढता कल, समाज विघातक प्रवृत्तींकडून प्रसारीत करण्यात येणारे
आक्षेपार्ह एसएमएस/चित्रफिती/छायाचित्रे, वाढती महागाई, दलीत-सवर्ण वादावरून उमटलेल्या
प्रतिक्रीया, कट्टर हिंदुत्वावादी / मुस्लीम संघटनांच्या वाढत्या हालचाली दिसून येत
आहेत. या दरम्यान उदभवणारी परिस्थिती हाताळण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था आबाधीत ठेवण्यासाठी
संपूर्ण हिंगोली जिल्हयात दि. 31 जानेवारी, 2017 रोजीचे 6.00 वाजेपासुन ते दि. 14 फेब्रुवारी,
2017 रोजीचे 24.00 वा. पावेतो मुंबई पोलिस कायदा 1951 कलम 37 (1) (3) चे आदेश निर्गमित
करण्यात येत असल्याचे प्रसिध्दी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
*****
No comments:
Post a Comment