राज्यघटनेमुळे नागरिकांना राज्यकारभारात
सहभागी होण्याचा अधिकार मिळाला
--- पालकमंत्री दिलीप कांबळे
हिंगोली, दि.26:- लोकशाही तंत्राने
राज्यघटनेनुसार देशाचा कारभार सुरु झाल्याने देशातील नागरिकांना राज्यकारभारात सहभागी
होण्याचा अधिकार मिळाल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन, अल्पसंख्यांक
विकास व वक्फ मंत्री तथा हिंगोली
जिल्हा पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी केले.
येथील संत नामदेव कवायत मैदान येथे आयोजित
67 व्या प्रजासत्ताक दिनांच्या ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा
परिषदेच्या अध्यक्षा लक्ष्मीबाई यशवंते, खासदार राजीव सातव, आमदार तान्हाजी मुटकूळे,
जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तूम्मोड,
पोलिस अधिक्षक आशोक मोरोळे, अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन
गुंजाळ, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, उपजिल्हाधिकारी
खुदाबक्ष तडवी, जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण, मुख्याधिकारी रामदास पाटील,
नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती
होती.
पालकमंत्री श्री. कांबळे पुढे म्हणाले
की, 26 जानेवारी, 1950 रोजी भारतीयांसाठी लोकशाही प्रणालीचा दीपस्तंभ ठरलेली भारतीय
राज्यघटना राष्ट्राला अर्पण करण्यात आली. भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केल्याने देशाने
लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा
केला जातो. जगामध्ये भारत देश एक प्रजासत्ताक गणराज्य म्हणून उदयास आले.
यावेळी
पालकमंत्री श्री. कांबळे यांनी पोलिस, गृहरक्षक दल तसेच अन्य जवानांच्या संचलनाची मानवंदना
स्वीकारली. यामध्ये पोलीस विभागाचे गृहरक्षक दल, अग्निशमन दल, नॅशनल
कॅडेट कोर, श्वान पथक, वज्र वाहन, दहशतवाद
विरोधी वाहन, सामाजिक वनीकरणाचा हरित चित्ररथ, आरोग्य विभागाचे आरोग्य पथक यांच्यासह विविध शाळेतील
मुलां-मुलींनी देखील या संचलनात सहभाग घेतला होता. पालकमंत्री श्री. कांबळे
यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देवून
गौरविण्यात आले.
जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांना
पालकमंत्री श्री. दिलीप कांबळे
यांच्या हस्ते सत्कार
जिल्हा सैनिक
कल्याण विभागाच्यामार्फत सशस्त्र सेना ध्वज दिन 2015 निधी संकलनाच्या उत्कृष्ट कार्याबाबत
महाराष्ट्र शासनातर्फे सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्याकडून प्राप्त स्मृतीचिन्ह जिल्हाधिकारी
श्री. अनिल भंडारी यांना पालकमंत्री दिलीप
कांबळे यांच्या हस्ते स्मृति चिन्ह देवून सन्मानित केले. त्याच बरोबर अप्पर जिल्हाधिकारी
राम गगराणी यांनाही सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात केले.
हिंगोली भारत
स्काऊट आणि गाईडस जि. हिंगोली राष्ट्रपती पुरस्कार प्रमाणपत्र श्री. सचिन अशोक पवार
व महेश मुरलीधर शेवाळे यांना देवून सन्मानित करण्यात आले.
तसेच महाराष्ट्र
शासनाचा दोन कोटी वृक्ष लागवड योजनेतंर्गत “ SELFIE
WITH TREE’’ या स्पर्धेत सहभाग घेतला होता. सदर राज्यस्तरावर निवड झाली म्हणून महाराष्ट्र
शासन वनविभागातर्फे मोबाईल व प्रशस्तीपत्र देवून पालकमंत्री श्री. दिलीप कांबळे यांनी
सन्मानित केले.
***
No comments:
Post a Comment