05-औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघात
मतदारांना मतदान करायला विशेष नैमित्तिक सुट्टी
हिंगोली, दि. 27 :- उपआयुक्त (सा.प्र.) तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी, 05 - औरंगाबाद
विभाग शिक्षक मतदारसंघ, औरंगाबाद यांचे पत्र दि. 24 जानेवारी, 2017 अन्वये शासन
निर्णय क्रमांक: 23 जून, 2011 ची प्रत प्राप्त झाली असून सदर शासन निर्णयान्वये
महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 – औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाचे मतदार
असलेल्या कर्मचाऱ्यांना सदर निवडणूकीच्या दिवशी म्हणजेच शुक्रवार, दि. 03
फेब्रुवारी, 2017 रोजी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमित्तिक रजा मंजूर
करण्यात यावी असे कळविले आहे. सदर रजा ही कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या
नैमित्तिक रजे व्यतिरिक्त असेल असेही निर्देश प्राप्त झालेले आहेत, असे आवाहन
जिल्हा निवडणूक कार्यालय, हिंगोली यांच्यावतीने प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
*****
No comments:
Post a Comment