पीसीपीएनडीटी
कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी
--- जिल्हाधिकारी अनिल
भंडारी
हिंगोली,
दि.20:- जिल्हय़ात
गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व लिंगनिदान प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरीता
जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अनिल भंडारी
यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झालेल्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियान आढावा
बैठकीत बोलत होते. यावेळी पोलिस अधिक्षक अशोक मोराळे, जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी श्री. एच.पी. तुम्मोड, उपविभागीय अधिकारी विवेक काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. धनवे,
महिला बाल विकास विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती ढेरे यांची
उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. भंडारी म्हणाले
की, जिल्ह्यातील मुलींच्या जन्मदरात वाढ होण्याकरिता स्त्रीभ्रूण हत्याविरोधी कायद्यांची
प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच मुलींच्या जन्माविषयी नागरिकांच्या विचारात बदल
होण्याकरीता जनजागृती करावी. स्त्रीभ्रूण हत्या विरोधी कायदा, मुलींना शासनामार्फत
देण्यात येणाऱ्या शैक्षणिक व इतर सवलती याविषयी माहिती देण्यात
याव्या. तसेच या अभियानातंर्गत विविध उपक्रम राबवून स्त्रीभ्रूण हत्या रोखणे,
मुलींचे संगोपन व त्यांना उच्च शिक्षण देण्यासाठी जिल्ह्यात व्यापक जनजगृती मोहीम
राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. भंडारी यांनी दिल्या.
सर्वप्रथम जिल्हा परिषदेच्या महिला व
बालकल्याण समितीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान
समितीचे सदस्य सचिव तृप्ती ढेरे यांनी अभियानविषयक माहितीचे सादरीकरण केले.
****
1 comment:
मला लोन करायचं आहे साहेब
Post a Comment