जिल्हा
परिषद-पंचायत समिती निवडणूक आदर्श आचारसंहितेचे पालन करा
-- जिल्हाधिकारी अनिल भंडारी
हिंगोली, दि.
12 : जिल्हा परिषद आणि
पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही
याची काळजी घेऊन आचारसंहितेचे पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अनिल भंडारी
यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात निवडणूक आचारसंहितेच्या संदर्भात आयोजित
अधिकाऱ्यांच्या बैठकीत श्री. भंडारी बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल
माचेवाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री.
रणवीरकर, उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी, जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण
यांच्यासह सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. भंडारी पुढे म्हणाले की, जिल्हा
परिषद आणि पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता 11 जानेवारी पासून
जिल्ह्यात लागू झाली आहे. आदर्श
आचारसंहितेची काटेकोर पालन करण्यासाठी विविध यंत्रणांवर जबाबदाऱ्या सोपविण्यात
येणार आहे. आचारसंहितेच्या काळात मतदारांवर प्रभाव पडेल असे कोणतेही
कार्यक्रम आयोजित करु नये. या काळात नवीन कामे सुरू करता येणार नाही. नवीन
नियुक्त्या, बदल्या, भरत्या करता येणार नाही. कोणतेही धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत
शंका असल्यास राज्य निवडणूक आयोग किंवा जिल्हा निवडणुक विभागाचे मार्गदर्शन
घेण्यात यावे. आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत सभा, मिरवणुका, भितीपत्रके,
पोस्टर्स, बॅनर्स लावण्याबाबत कायद्याचे काटेकोरपणे पालन करावे. सदर
निवडणुकीकरीता उमेदवारांना आपले नामनिर्देशन पत्रे 24 तास ऑनलाईन भरता येणार
असल्याने विद्युत विभागाने विद्यूत पुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता घ्यावी.
तसेच आदर्श आचारसंहितेची काटेकोर पालन करण्यासाठी विविध
यंत्रणांवर जबाबदाऱ्या सोपविण्यात येणार आहे. विशेष करुन संशयास्पद आर्थिक
व्यवहारांवर नजर ठेवण्यासाठी फिरते पथकांची नियुक्ती करणे, शांतता-सुव्यवस्थेसाठी
अवैध प्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी नियोजन करणे, अवैधरित्या मद्य व मांस
विक्रीवर नजर ठेवणे, यासाठीच्या नियोजनाबाबतही निर्देश दिले. निवडणूक काळातील
आर्थिक व्यवहारांबाबत व्यावसायीक, व्यापारी तसेच अन्य प्राधिकरणांनी, विहित
पद्धतीचा अवलंब करतात का यासाठी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश ही श्री.
भंडारी यांनी यावेळी दिले.
*****
No comments:
Post a Comment