विद्युत सुरक्षा सप्ताहात विजेचे उपकरण हाताळणी संदर्भात
मार्गदर्शन
हिंगोली, दि. 13 :- विद्युत सुरक्षे विषयी लोकांना माहिती मिळावी यासाठी
महाराष्ट्र शासन, उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या वतीने दिनांक 11 ते 17 जानेवारी,
2017 या कालावधी दरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने
आज रोजी सकाळच्या सत्रात हिंगोली येथील मौलाना आझाद उर्दु ज्युनिअर कॉलेज येथे विद्यार्थांना
विद्युत सुरक्षा सप्ताह निमित्य विद्युत सुरक्षे बाबत एस. व्हि. निरावार, सहाय्यक अभियंता
श्रेणी 2 यांनी या वेळी विजेच्या उप करणाची सुरक्षित हाताळणी कशी करायची याचे मार्गदर्शन
केले व प्रतिज्ञा वदवून घेतली.
दुपारच्या सत्रात शासकीय तंत्रनिकेतन,
एम.आय.डि.सी, लिंबाळा हिंगोली येथे विद्युत सुरक्षे बाबत कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे
उदघाटन श्री. लोळगे यांनी केले.अध्यक्षस्थान शासकिय तंत्रनिकेतनचे प्राचार्य श्री.
कादरी सर यांनी भुषविले तर प्रमुख वक्ते म्हणून राजेश नांदगावकर शासकिय विद्युत ठेकेदार
यांची उपस्थिती होती श्री. नांदगावकर यांनी त्यांचे अनुभव सांगत विध्यार्थांना विजे
बद्दल जागरुक केले.
विद्युत निरीक्षक कार्यालय हिंगोली येथील एस.
व्हि. निरावार, सहाय्यक अभियंता श्रेणी 2 यांनी विजेचे महत्व व तसेच विजेचे धोके समजावून
सांगीतले व विजेचा शॉक लागल्यावर कृतीम श्वसन देवून विजेचा शॉक लागलेल्या इसमाचा जीव
कसा वाचवता येतो याचे प्रात्यक्षिक दाखविले सदर कार्यक्रमावेळी विद्युत निरीक्षक कार्यालय
हिंगोली येथील प्रतिनिधी एच.सी.अंबलिवादे व के.जी.घुगे उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment