राष्ट्रीय युवा दिनानिमित्त युवा
सप्ताहाचे आयोजन
हिंगोली, दि. 11 :- क्रीडा व युवक
सेवा संचालनालय, पुणे यांच्या आदेशान्वये व जिल्हा
क्रीडा अधिकारी
कार्यालय, हिंगोली व प्राचार्य शिवाजी महाविद्यालय, हिंगोली, श्री. पलसिद्ध स्वामी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, पुसेगांव ता. सेनगांव जि. हिंगोली, विजयदीप करीअर ॲकडमी, हिंगोली, प्राचार्य बाबुराव पाटील महाविद्यालय, हिंगोली, जिल्हा परिषद प्रशाळा, हिंगोली जिल्हा कराटे असोसिएशन, हिंगोली, संत नामदेव
सेवाभावी संस्था, नर्सी (ना) ता.जि. हिंगोली, युवा प्रतिष्ठाण, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 12 ते 19 जानेवारी या कालावधीत जिल्ह्यात युवक/युवतींसाठी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी आपल्या
शाळा/महाविद्यालयातील युवक/युवतींना सदर कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहीत करावे व युवा
दिन युवा सप्ताहात सहभागी होवून आपल्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना चालणा देण्यासाठी या संधीचा
लाभ द्यावा, असे आवाहन
जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. नरेंद्र पवार, यांनी केले आहे.
या युवा सप्ताहमध्ये पुढीलप्रमाणे
कार्यक्रम असणार आहे. 1) दिनांक 12 जानेवारी, 2017 रोजी सकाळी 11.00 वाजता स्वामी विवेकानंद
यांचे तत्वज्ञान व शिकवण / त्यांचे कार्य, प्रेरणादायी विचार युवकांना अवगत करणे, स्थळ
- शिवाजी महाविद्यालय, हिंगोली, 2) दिनांक 13 जानेवारी, 2017 रोजी सकाळी 11.00 वाजता
युवकांसाठी रोजगार व स्वयंरोजगार, व्यवसाय, नोकरीतील संधीबाबत तज्ज्ञाकडून मार्गदर्शक,
स्थळ - केदार ट्रेनिंग सेंटर, श्री. पलसिध्द स्वामी बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, पुसेगाव
ता. सेनगाव, 3) दिनांक 14 जानेवारी, 2017 रोजी सकाळी 11.00 स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन,
स्थळ- विजयदीप करीअर ॲकॅडमी, आदर्श महाविद्यालय सोसायटी बिल्डींग, हिंगोली, 4) दिनांक 15 जानेवारी, 2017 रोजी सकाळी
11.00 व्हॉलीबॉल स्पर्धा, इंदिरा गांधी कन्या विद्यालय, जवळा बाजार, 5) दिनांक 16 जानेवारी,
2017 रोजी सकाळी 11.00 युवती व महिलांसाठी स्वंयसंरक्षणार्थ कार्यक्रम, स्थळ - प्रमोद
वाघमारे / गोपाल ईसावे, जिल्हा परिषद प्रशाला, हिंगोली, 6) दिनांक 17 जानेवारी,
2017 रोजी सकाळी 11.00 युवकांसाठी परिसंवाद - युवा विचारांचे आदान-प्रदान, स्थळ - केशव
मोरे, संत नामदेव सेवाभावी संस्था, नर्सी (ना.) ता.जि. हिंगोली, 7) दिनांक 18 जानेवारी,
2017 रोजी सकाळी 11.00 निबंध स्पर्धा, स्थळ - शंभुराजे गड, प्लॉट न. 88, महाकाली नगर,
अकोला रोड, हिंगोली, 8) दिनांक 19 जानेवारी, 2017 रोजी दुपारी 2.00 युवा सप्ताह समारोप
व बक्षीस वितरण, स्थळ - शिवाजी महाविद्यालय, हिंगोली याप्रमाणे सदर युवा सप्ताहात कार्यक्रमाचे
आयोजन केले आहे. तरी जिल्ह्यातील शाळा / महाविद्यालयातील युवक / युवतींनी जास्तीत-जास्त
संख्येने यात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, हिंगोली यांनी
केले आहे.
*****
No comments:
Post a Comment