सेल्फी
विथ ट्री स्पर्धेसाठी
अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी व गजानन जकाते यांना पारितोषिक प्रदान
हिंगोली, दि. 31 :-
राज्यात वन विभागामार्फत दि. 01 जुलै, 2016 रोजी दोन कोटी
वृक्ष लागवड कार्यक्रमात सेल्फी विथ ट्री या स्पर्धेचे आयोजन केले होते. या
स्पर्धेत राज्यभरातुन 2 हजार 692 प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह नागरिकांनीही वृक्ष
लागवड करतांना सेल्फी काढुन स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. दिनांक 22 जुलै, 2016
रोजी मा. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी लकी ड्रा काढुन संपुर्ण राज्य भरातुन
23 स्पर्धकांची पारितोषिकांसाठी निवड केली होती.
हिंगोली जिल्हयातुन दोन
स्पर्धकांची निवड झाली असुन त्यामध्ये अपर जिल्हाधिकारी रामनारायण गगराणी व गजानन
जकाते यांना महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामार्फत पुरस्कार 26 जानेवारी 2017 रोजी
पोलीस कवायत मैदान येथे प्रदान करण्यात आला.
*****
No comments:
Post a Comment