जिप/पंस
निवडणुक आचारसंहिता अंमलबजावणीवर देखरेखीसाठी ‘कॉप
मोबाईल ॲप’
हिंगोली, दि.30: राज्य निवडणूक आयोगाने
नुकताच जिल्हा परिषद/पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला असून, या सार्वत्रिक निवडणूक आदर्श
आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी आणि प्रचारातील गैरप्रकारांना आळा
घालण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने कॉप (सीओपी- सिटिझन ऑन पोर्टल) हे अॅप तयार
केले आहे.
या अॅपच्या माध्यमातून सामान्य नागरिकांची उमेदवाराच्या आणि राजकीय
पक्षांच्या निवडणुकीतील प्रत्येक हालचालीवर नजर राहणार आहे. आदर्श आचारसंहितेच्या
कालावधीत नागरिकांना काही गैरप्रकार आढळल्यास छायाचित्रासह त्याची माहिती तात्काळ
निवडणूक आयोगाकडे तक्रार स्वरूपात नोंदविता येणार आहे. त्यामुळे आचारसंहितेत
समाजमाध्यमांचा उपयोग करुन प्रचार करणाऱ्यांवर मतदार या कॉप अॅपद्वारे नजर ठेवू
शकणार आहे. या अॅपद्वारे मतदारांना उमेदवारांनी केलेल्या आचारसंहिता भंगाच्या
तक्रारी निवडणूक आयोगाकडे दाखल करता येणार आहेत. या अॅपद्वारे तक्रार केलेल्या
तक्रारदाराची माहिती गुप्त ठेवण्यात येणार असून तक्रारीवर झालेल्या कार्यवाहीचा
अहवाल तक्रारदारास अॅपमार्फत प्राप्त होणार आहे.
निवडणुक आदर्श आचारसंहिता कालावधीत जाहिराती, भित्तिपत्रके, पोस्टर,
खासगी पेड न्यूज, विविध समाजमाध्यमे, पैसे, भेटवस्तू, घोषणा, प्रचार फेऱ्या, सभा
आदी बाबतच्या तक्रारी आता मतदारांना निवडणूक आयोगाकडे करता येणार आहे, अशी माहिती
जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
*****
No comments:
Post a Comment