वाहतुकीचे नियम पालन करण्यास स्वत:पासून सुरूवात करण्याचे
आवाहन
हिंगोली, दि. 12 :- कै. डॉ. शंकरराव सातव महाविद्यालय, कळमनुरी येथे आज महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी
रस्ता सुरक्षा विषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात उप प्रादेशिक
परिवहन अधिकारी अशोक पवार यांनी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा विषयक मार्गदर्शन करून
दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करावा व विना परवाना वाहन चालवु नये तसेच आपण स्वत:
वाहतुकीचे नियम पाळून रस्त्यावरील अपघात कमी होण्यास हातभार लावावा, असे आवाहन उप प्रादेशिक
परिवहन अधिकारी अशोक पवार यांनी केले.
मोटार वाहन निरीक्षक नितीन जाधव यांनी पॉवर पॉईंट
प्रेझेन्टेशन व अपघातावरील व्हीडीओ क्लीप उपस्थित विद्यार्थ्यांना दाखवून त्याविषयी
मार्गदर्शन केले. कै. डॉ. शंकरराव सातव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बबनराव पवार यांनी
आभार मानुन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना हेल्मेट बंधनकारक करू असे आश्वासन यावेळी
दिले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक मोटार वाहन
निरीक्षक डी. एस. साळुंके यांनी प्रयत्न केले.
*****
No comments:
Post a Comment