डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी अर्ज करावेत
हिंगोली, दि. 11 :- राज्य शासनाच्या अल्पसंख्यांक
विकास विभागाकडुन शासन निर्णय क्र.अविवि-2010/प्र.क्र.152/10/का-6 दि.11 ऑक्टोंबर
2013 च्या तरतुदीनुसार डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजने अंतर्गत जिल्ह्यातील
ज्या मदरसा धर्मदाय आयुक्त अथवा महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत आहेत. अशा
मदरसांना मरदशांच्या आधुनिकरीकरणासाठी पायाभुत सुविधा, ग्रंथालयासाठी व शिक्षकांच्या
मानधनासाठी शासन स्तरावरुन अनुदान उपलब्ध होणार आहे.
याकरिता योजनेच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे असणार आहे.
1) मदरसा चालविणारी संस्था अथवा मदरसा,
धर्मदाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत आहेत. अशा मदरसांना सदर योजनेचा लाभ
दिला जाईल. 2) ज्या मदरसांना
scheme for providing qulity education in madarasa या केंद्र पुरस्कृत योजने अंतर्गत लाभ मिळाला आहे
अशा मदरशांना ही योजना अनुज्ञेय राहणार नाही. 3) शासन निर्णयात नमुद पायाभुत सुविधांसाठी रु.2 लाख अनुदान देय आहे.
यापूर्वी ज्या प्रयोजनासाठी अनुदान देण्यात आले आहे त्या प्रयोजनासाठी पुन्हा अनुदान
अनुज्ञेय असणार नाही. 4) शासन निर्णयातील
तरतुदीनुसार जास्त 3 डी.एड/बी.एड शिक्षकांना मानधन देण्यात येईल. शिक्षणासाठी हिंदी/इंग्रजी/
मराठी / उर्दु यापैकी एका माध्यमाची निवड करुन त्यानुसार शिक्षकांची नेमणुक करणे आवश्यक
राहील. 5) सदर अनुदान शासन निर्णयामध्ये
नमुद पायाभूत सुविधा वगळून इतर सुविधांसाठी अनुज्ञेय असणार नाही. 6) शासन निर्णय क्र.अविवि-2010/प्र.क्र.152/10/का-6
दि.21 ऑक्टोंबर 2013, अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपत्रांची यादी https://mdd.maharashtra.gov.in या संकेत
स्थळावर उपलब्ध आहे. 7) अल्पसंख्याक
विकास विभाग महाराष्ट्र शासन यांचे सदर योजनेचे शासन निर्णय क्र.अविवि-2010/प्र.क्र.152/10/का-6
दि.11 ऑक्टोंबर 2013 मधील सर्व अटी व शर्ती
लागु राहतील.
तरी
जिल्ह्यातील इच्छुक मदरसांनी अल्पसंख्याक विकास विभाग, शासन निर्णय दिनांक
11.10.2013 मध्ये नमुद केलेल्या विहीत नमुन्यातील परिपुर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रे जोडून
परिपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथील जिल्हा नियोजन समिती, कार्यालय
येथे दि. 25 जानेवारी, 2017 रोजी संध्याकाळी 5.00 वाजे पर्यंत सादर करावे, व सदर योजनेचा
लाभ घ्यावा. विहीत मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत.
*****
No comments:
Post a Comment